Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून सर्व तयारी करा, राज्य सरकार पाठीशी – अजित पवार

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार संपूर्ण ताकदीनिशी जिल्ह्याच्या पाठीशी आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्यासह सर्व यंत्रणांच्या सहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणावी, असा विश्वास अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिलाय.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून सर्व तयारी करा, राज्य सरकार पाठीशी - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 5:34 PM

बीड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बीड जिल्ह्याचा दौरा केला. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार संपूर्ण ताकदीनिशी जिल्ह्याच्या पाठीशी आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्यासह सर्व यंत्रणांच्या सहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणावी, असा विश्वास अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिलाय. तर बीड जिल्हा आरोग्य विभागाने दोन्ही लाटेत युध्दास्तरावर काम केलं. जिल्ह्याचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रेट आजही विभागात जास्त आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून त्या दृष्टीने तयारी करावी, अशी सूचना राजेश टोपे यांनी केलीय. (Ajit Pawar’s suggestion to prepare against the backdrop of the third wave of corona)

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील covid-19 विषाणू प्रादुर्भाव आढावा आणि जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड मध्ये कोरोना बाधित रुग्णांचे आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोना नियंत्रणासाठी राज्यशासन अनेक उपाय योजना करीत आहे. या प्रयत्नांना यशही आलं आहे. औषधं, आरोग्य सुविधा वाढवतानाच कोरोना लसीकरण गतीने होण्याच्या दृष्टीनं अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांसह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

संपूर्ण राज्यासाठी तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन साठा असावा यादृष्टीने उपाययोजना करताना शासनाने यासाठी सवलती दिल्या आहेत. मोठ्या खाजगी रुग्णालयांनी आपली ऑक्सिजनची यंत्रणा सुसज्ज करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी रुग्णांचा झालेला मृत्यू ही दुर्दैवी बाब आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 14 केएल क्षमतेचा एक लिक्विड ऑक्सिजन टॅंक उपलब्ध करून लिक्विड ऑक्सिजन साठा सुरक्षित करावा, तसंच रिकामे झालेले सिलेंडर हे ग्रामीण भागात वापरावेत, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी केलीय.

सचिवांना थेट दूरध्वनीवरून सूचना

रुग्णवाहिका मागणीचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी तसेच म्यूकरमायकोसिस आजारवरील यंत्रणा उपलब्ध करून घेण्यातील अडचणी सोडविण्यासाठी अजित पवार यांनी राज्याचे आरोग्य आयुक्त रामस्वामी यांच्याशी थेट दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी रुग्णवाहिका खरेदीसाठी तांत्रिक मान्यता अधिकार जिल्हा स्तरावर देण्याचा निर्णय आजच्या आज आरोग्य विभागाने करावा, असे निर्देशही पवार यांनी दिले आहेत. त्याचबरोबर माजलगावमध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात यावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Video : अजित पवारांकडून उस्मानाबादेत माणुसकीचं दर्शन, मुसळधार पाऊस सुरु असल्याने ‘गार्ड ऑफ ऑनर’ नाकारला

Video : ‘अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं’, बीडमधील लाठीमाराच्या प्रकारानंतर पंकजा मुंडेंची टीका

Ajit Pawar’s suggestion to prepare against the backdrop of the third wave of corona

कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांन
कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांन.
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले.
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.