नाशिकमध्ये आजपासून 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण
नाशिकच्या कॉलेजमध्ये आजपासून 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मंत्री उदय सामंत यांंनी तशा सूचना दिल्या आहेत.
नाशिकः नाशिकच्या कॉलेजमध्ये आजपासून 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मंत्री उदय सामंत यांंनी तशा सूचना दिल्या आहेत.
नाशिकमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. विशेषतः सिन्नर, निफाड आणि येवला हे हॉटस्पॉट झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिक शहरातील महाविद्यालयांमध्ये 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लस घ्यायला लावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने ही तयारी केली आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेतलेले पालक आणि विद्यार्थी या दोघांनाही दिलासा मिळणार आहे.
नाशिकमध्ये विक्रमी लसीकरण
एकीकडे संपूर्ण देशात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असताना, दुसरीकडे नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण केले आहे. नाशिक विभागाला पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यामुळे हे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.
मुबलक डोसचा पुरवठा
नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी वेळोवेळी कोव्हॅक्सिन 15,99,370 डोसेस आणि कोविडशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या दोन प्रकारच्या कोरोना लसीचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विभागात 1, 29, 34, 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तांकडून देण्यात आली.
नाशिक जिल्हा
नाशिक जिल्ह्यात एकूण 45 लाख 12 हजार 691 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 32 लाख 90 हजार 262 जणांनी पहिला डोस घेतला असून 12 लाख 22 हजार 429 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
अहमदनगर, धुळे
अहमदनगर जिल्ह्यात एकूण 32 लाख 52 हजार 514 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 24 लाख 10 हजार 016 जणांनी पहिला डोस घेतला असून 08 लाख 42 हजार 498 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 14 लाख 32 हजार 592 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 09 लाख 79 हजार 876 जणांनी पहिला डोस घेतला असून 04 लाख 52 हजार 716 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
जळगाव, नंदुरबार
जळगाव जिल्ह्यात एकूण 27 लाख 09 हजार 094 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 20 लाख 36 हजार 779 जणांनी पहिला डोस घेतला असून 06 लाख 72 हजार 315 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 10 लाख 28 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 07 लाख 710 जणांनी पहिला डोस घेतला असून 03 लाख 27 हजार 292 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
इतर बातम्याः
साहित्य संमेलनापूर्वीच सणसणीत वाद; नोव्हेंबरमध्येच घ्या, ठाले-पाटलांचे निमंत्रकांना खडे बोल!
कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अतिवृष्टी अनुदान वाटपात घोळ; निधी येऊनही अतिरिक्त 29 कोटींची मागणी, चौकशीचे लचांडhttps://t.co/juyDdgRSuc#CMMaharashtra #UddhavThackeray #AgricultureMinisterDadaBhuse #MalegaonExcessiverainfall #distributionofgrants #confusioninofgrants
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2021