‘स्पुटनिक’साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत चर्चा सुरु, ग्लोबल टेंडर रद्द झालं तरी मुंबईला लस मिळणार

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शविली आहे.

'स्पुटनिक'साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत चर्चा सुरु, ग्लोबल टेंडर रद्द झालं तरी मुंबईला लस मिळणार
स्पुटनिक लसीसाठी मुबंई महापालिकेची डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरिजसोबत चर्चा सुरु
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 7:12 PM

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी मुंबई महापालिकेलं कोरोना लसींसाठी काढलेलं ग्लोबल टेंडर निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र ठरली नसल्यानं हे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. असं असलं तरी स्पुटनिक या रशियाच्या लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आलीय. (Discussions for Sputnik vaccine with Dr. Reddy’s Laboratories, Says BMC)

मुंबई महापालिकेला कोरोना लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर 12 मे 2021 रोजी स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest) प्रकाशित केली. त्याला प्रतिसाद देणाऱ्या संभाव्य पुरवठादारांना (Supplier)आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीला 25 मे 2021 पर्यंत आणि दुसऱ्यावेळी 1 जून 2021 पर्यंत अशी दोनवेळा मुदतवाढ दिली. तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देऊन दूरदृश्य प्रणालीद्वारे सातत्याने चर्चादेखील केली, अशी माहितीही महापालिकेनं दिलीय.

कागदपत्रांची पूर्तता नसल्यानं सर्व पुरवठादार अपात्र

विशेषतः लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस निर्मिती कंपन्या या दोघांमध्ये असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अत्यावश्यक होते. जेणेकरुन दिलेल्या मुदतीत आणि सुरळीपणे लस पुरवठा होईल, याची खात्री पटेल. त्यासोबत नेमक्या किती दिवसात लस पुरवठा होईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या 4 मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन महानगरपालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सातत्याने पाठपुरावा करीत होते, असंही महापालिकेनं म्हटलंय. अंतिम मुदतीनंतर 9 संभाव्य पुरवठादारांनी सादर केलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची महानगरपालिका प्रशासनाने छाननी केली. छाननीअंती यातील एकही पुरवठादार संपूर्ण कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी पात्र ठरु शकलेला नाही, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.

जून अखेरिस स्पुटनिक लस मिळणार

असं असलं तरी मुंबई महापालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. प्रशासनाकडून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी स्पुटनिक लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी आज चर्चा केली. त्यानुसार, प्रायोगिक तत्वावर स्पुटनिक लसीचा काही प्रमाणात साठा बृहन्मुंबई महानगरपालिकेला जून 2021 अखेरपर्यंत देण्याची तयारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दर्शविली आहे.

8 ते 10 दिवसांत पुन्हा चर्चा केली जाणार

स्पुटनिक लसीच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत. त्यामुळे हा साठा मिळाल्यानंतर त्याच्या शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी करण्यात येईल. तसेच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत स्पुटनिक लसीचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबतही रेड्डीज लॅबोरेटरीजकडे विचारणा करण्यात आली आहे. यानुसार येत्या 8 ते 10 दिवसांत पुन्हा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासमवेत चर्चा केली जाणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

Corona Vaccine | एकही कंपनी पात्र ठरली नाही, अखरे मुंबई महापालिकेचं ग्लोबल टेंडर रद्द

म्युकरमायकोसीच्या रुग्णांनाही मोठा दिलासा, अवाजवी दर आकारता येणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Discussions for Sputnik vaccine with Dr. Reddy’s Laboratories, Says BMC

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.