AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus | मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरघोस प्रतिसाद, दोन दिवसात 12 कोटींहून अधिक रक्कम जमा

मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले (Corona Virus CM Relief Fund) आहे.

Corona Virus | मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरघोस प्रतिसाद, दोन दिवसात 12 कोटींहून अधिक रक्कम जमा
Follow us
| Updated on: Mar 30, 2020 | 10:45 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा सामना (Corona Virus CM Relief Fund) करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती आणि संस्थानी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद देत गेल्या दोन दिवसात 12 कोटी 50 लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. यात योगदान देणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

तसेच 20 मार्चपासून आतापर्यंत सीएसआर निधीतून (Corona Virus CM Relief Fund) तसेच देणगी स्वरुपात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाकडे अनेक उद्योग आणि संस्थानी मदत देणे सुरु केले आहे.

इंडियन ह्यूम पाईप, रायचंद ट्रस्ट, वालचंद ट्रस्ट, इंडियन ऑइल, आयसीआयसीआय, बादल मित्तल ग्रुप, फ़ार्म इझी, महानगर गॅस, सिप्ला फॉउंडेशन, गोदरेज ग्रुप, जेएम फायनांशियल, मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्स, सत्व कंसल्टिंग, पल्लवी चोक्सी, एम्एसईडीसीएल, इंडियन मर्चेंट्स चेंबर, बलदेव अरोरा ट्रस्ट, एशियन पेंट्स, हायकेल इंडिया या संस्थानी जवळपास 10 कोटींची उपकरण आणि वैद्यकीय साहित्य दिलं आहे. यात मास्कस, व्हेन्टीलेटर, पीपीई किट्स, आरटी- पीसीआर मशीन, मल्टी लोडर रेडिओग्राफी सिस्टिम, मोटराइज्ड बेड्स, फ्रीजर यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19

कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

सढळ हाताने मदत करा

उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले (Corona Virus CM Relief Fund) आहे.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....