नागपूर: नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये नियमांची काटेकोर अमलबजावणी केली जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपुरात आता कोणत्याही कार्यक्रमासाठी आठ दिवस आधीच परवानगी घेणं बंधनकारक आहे. तसेच शहरात संचारबंदी लागू करण्याची स्थानिकांमधून मागणीही होत आहे. त्यामुळे शहरात संचारबंदी लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Coronavirus: Covid cases rise again in nagpur)
चार महिन्यानंतर नागपुरात 600 हून अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६४४ नवे रुग्ण आढळले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या तोंडचे पाणी पळाले असून कोरोनाला नियंत्रण घालण्यासाठी शहरात पुन्हा एकदा जोर बैठकांना उधाण आलं आहे. शहरात रुग्णसंख्येचा स्फोट होत असल्याने नागपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याची मागणी होत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आवर घालण्यासाठी जिल्ह्यात कोणत्याही कार्यक्रमासाठी आता आठ दिवस आधी परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
कूक निघाला पॉझिटिव्ह, पिझ्झा हट बंद
लक्ष्मी नगर येथील लक्ष्मी नगर पिझ्झा हटचा कूक पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे हा पिझ्झा हट सील करण्यात आला आहे. तर कूकच पॉझिटिव्ह निघाल्याने खवय्यांचीही धाकधूक वाढली आहे.
30 ते 40 वयोगटातील सर्वाधिक रुग्ण
नागपुरात 30 ते 40 वयोगटातील तरुणांना कोरोनाची सर्वाधिक लागण झाल्याचं दिसून आलं आहे. तरुणांकडून बाजार, मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शिवाय अनेकजण मास्कविनाच फिरत असल्याने संसर्ग अधिकच बळावत आहे. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्याची पुन्हा वेळ येऊ देऊ नका. कोरोना नियमांचे पालन करा, असं आवाहन नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.
डॉक्टरांनाही कोरोना
दोन दिवसांपूर्वी नागपूर मेडिकल कॉलेजमधील कोरोना बाधितांचा आकडा 38 वर गेला होता. त्यात डेंटल महाविद्यालयातील 9, एमबीबीएसच्या 12, पीजी करणाऱ्या 9 आणि तीन स्टाफ नर्सचा समावेश होता. त्यापैकी चार जणांना गृह विलगिकरनात ठेवण्यात आलं आहे. तर बाकी सगळ्यांवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. यातील अनेकजण हे लक्षण नसलेले आहेत. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सुद्धा भरती करून घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कॉलेज सुरू झालं. त्यात वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी आले होते. त्यामुळे या ठिकाणी येऊन त्यांना संक्रमण झालं. आता खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्टेल सॅनिटाइझ करण्यात आलं आहे, अशी माहिती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता अविनाश गावंडे यांनी दिली. (Coronavirus: Covid cases rise again in nagpur)
नागपूरमध्ये 12 फेब्रुवारी रोजी 319, 13 फेब्रुवारीला 486, 14 फेब्रुवारीमध्ये 455, 15 फेब्रुवारी रोजी 498 आणि 16 फेब्रुवारीला 535 सापडले. नागपूरमध्ये पाच दिवसात कोरोनामुळे एकूण 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर नागपूरमध्ये काल 96, नागपूर मनपा क्षेत्रात 502 आणि वर्ध्यात 62 रुग्ण सापडले आहेत. तर नागपूर परिमंडळात काल दिवसभरात 699 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागपूरकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नागपूरमध्ये आज किंवा उद्या पर्यंत पालिका प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Coronavirus: Covid cases rise again in nagpur)
LIVE : महाराष्ट्रातील घडामोडींचे महत्त्वाचे अपडेट्सhttps://t.co/lPvgQs2Psb#Maharashtra #LiveUpdates #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 19, 2021
संबंधित बातम्या:
(Coronavirus: Covid cases rise again in nagpur)