कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये समोर आलं धक्कादायक लक्षण, नाशिकमध्ये खळबळ

कोरोना होऊन गेल्यानंतर रुग्णांवर भयंकर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये समोर आलं धक्कादायक लक्षण, नाशिकमध्ये खळबळ
कोरोना संसर्ग वाढतोय
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 9:47 AM

नाशिक : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गाने अनेकांचा जीव घेतला. पण अखेर कोरोनाची लस आणि धोका कमी झाला. पण कोरोना होऊन गेल्यानंतर रुग्णांवर भयंकर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक नागरिकांना कोरोनानंतर लठ्ठपणाची समस्या उद्भवत असल्याचं सांगण्यात येत आहे. अशी अनेक प्रकरणं समोर आली असून नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण आहे. (coronavirus side effects Many citizens in Nashik district have the problem of obesity after corona)

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 7 हजाराहून अधिक कोरोनाग्रस्तांना बरं झाल्यानंतर लठ्ठपणाने भेडसावल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेकांचं वजन 10 ते 12 किलोपर्यंत वाढल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे पोस्ट कोरोना उपचारासाठी रुग्णांची डॉक्टरांकडे गर्दी वाढली आहे. यामुळे आणखी त्रास तर होणार नाही ना? अशी भीती आता रुग्णांच्या मनात आहे.

खरंतर, यावर अद्याप आरोग्य विभागाकडून अधिकृत माहिती आली नसली तरी कोरोना होऊन गेल्यानंतरही आरोग्यासाठी मोठा धोका आहे. याची अनेक धक्कादायक उदाहरणंही समोर आली आहेत. खरंतर, कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोना झाल्याची घटना याआधीच नाशिकमध्ये समोर आली होती. त्यामुळे कोरोना मुळापासून जाणार तरी कसा असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.

कोरोनाची ही लस घेतल्यानंतर काही किरकोळ दुष्परिणाम (Side effects) जाणवू शकतात. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला. (below 18 years person and pregnant women will not get corona vaccine says Rajesh Tope)

दरम्यान, राजेश टोपे यांनी कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितलं होतं. मात्र, लस घेतल्यानंतर काहीजणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो. यामध्ये लस दिलेल्या भागात सूज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा लक्षणांचा समावेश आहे. तर काहीजणांना ताप येणे किंवा चक्कर येण्यासारखी सामान्य लक्षणे जाणवू शकतात. शरीराला खाज येणे किंवा घाम सुटणे ही लक्षणे सामान्य नसली तरी त्यामुळे जीवघेणा धोका उद्भवणार नाही, अशी हमी राजेश टोपे यांनी दिली होती. (coronavirus side effects Many citizens in Nashik district have the problem of obesity after corona)

संबंधित बातम्या – 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्रच सरस; मृत्यूदर आणि सक्रीय रुग्णांची संख्या कमी

Marathi Song Out : कोरोना योद्धा ठरलेल्या सरपंचांना समर्पित, ‘हिरो सरपंच’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

(coronavirus side effects Many citizens in Nashik district have the problem of obesity after corona)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.