fake currency : जळगावात नकली नोटा बनविण्याचा तरुणाचा प्रताप; पोलिसांकडून पर्दाफाश
झटपट श्रीमंत होण्याच्या नादात जळगावच्या जामनेर तालुक्यातील हिंगणे येथे एका तरूणांने नकली नोटा छापल्या
जळगाव : झटपट श्रीमंत (Rich) होण्याच्या नादात अनेक जन वाममार्गाला लागतात. कोण जुगाराच्या नादाला लागतो तर कोण मटका खेळतो. तर कोण बेटिंगकडे वळतो. त्यात अनेकांचे नशीब हे उजळेलच असे काही नाही. तर या मार्गावर जाणार्यांचा शेवट हा तुरूंगात होत असतो. असाच काहीसा प्रयत्न जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात उजेडात आला आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात येथे एका तरूणाने चक्क नकली नोटाच (fake currency)छापण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्या प्रतापामुळे मात्र जळगाव पोलिसांची झोप उडाली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला जेरबंद केले. उमेश चुडामण राजपूत (वय 22) असे अटकेतील संशयितांचे नाव आहे. तर त्याच्याकडून नकली नोटा तयार करण्यासाठी लागणारे प्रिन्टर (youtube)जप्त करण्यात आला असून त्याने छापलेल्या 200 च्या 46 नकली नोटा ही हस्तगत करण्यात आल्या आहेत. आश्चार्याची बाब म्हणजे त्याने हा पराक्रम युट्यूब पाहून केला आहे.
युट्यूब पाहून नकली नोटा छापल्या
याबाबत मिळालेली माहिती अशी की, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात जळगावच्या जामनेर तालुक्यातील हिंगणे येथे एक तरूण नकली नोटा छापत होता. त्याची माहिती जामनेर पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. त्यावेळी जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रूक येथील उमेश चुडामण राजपूत (वय 22) याचे नाव समोर आले. त्यावेळी पोलिसांनी या संशयितांला ताब्यात घेतले. तसेच अधिक चौकशी केली असता, पोलीसही चक्रावले. उमेश राजपूत हा युट्यूब पाहून नकली नोटा छापत असल्याचे उघड झाले.
जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ
दरम्यान पोलिसांनी टाकलेल्या छापल्यात त्याच्याकडून नोटा बनविण्यासाठी लागणारे कागद जप्त करण्यात आला आहे. तसेच नकली नोटा तयार करण्यासाठी लागणारे प्रिन्टर ही ताब्यात घेण्यात आला आहे. तर त्याने छापलेल्या 200 च्या 46 नकली नोटा ही हस्तगत करण्यात आल्या आहेत. या घटनेने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याच्याआधीही जळगावच्या जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे अशीच घटना समोर आली होती. ज्यात बाजारात नकली नोटा चलनात आणणार्या नसरीन शेख खलील (पाचोरा) व सुलताना मोहंमद साबिर (शनिपेठ, जळगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.