एका दिवसात कोरोनाचे 5 रुग्ण सापडले, चाचण्या वाढवल्या, इतर साथींच्या आजरांमुळे आरोग्य विभागाची दमछाक

राज्यातील वातावरणात मागच्या काही दिवसांपासून फरक पडला आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण आणि अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे, त्यामुळे संसर्गजन्य आजारांनी पुन्हा डोकेवरती काढले आहे.

एका दिवसात कोरोनाचे 5 रुग्ण सापडले, चाचण्या वाढवल्या,  इतर साथींच्या आजरांमुळे आरोग्य विभागाची दमछाक
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 12:05 PM

जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : जिल्ह्यात कोरोनाने (covid patient) पुन्हा डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात पाच दिवसांत पाच रुग्ण (nandurbar corona patient) आढळल्याने आले आहेत, त्यामुळे आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे. जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेतील (Nandurbar Zilla Parishad) एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कार्यालयात खळबळ उडाली होती. त्यानंतर, पुन्हा चार रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखीही वाढली आहे. कोरोना पुन्हा सक्रीय झाल्यामुळे चाचणी वाढवणे गरजेचे झालं आहे, तर दुसरीकडे तापमान बदलत असल्याने मोठ्या प्रमाणावर सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण अधिक रुग्णालयात येत आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनवर मात करण्यासाठी अधिक तयारी करून ठेवली आहे. मात्र रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

संसर्गजन्य आजार सुध्दा वाढले आहेत

मागच्या तीन वर्षात आपण जी काळजी घेतली होती. त्याचपद्धतीची काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. कारण कोरोना पुन्हा सक्रीय झाल्यामुळे अनेकांनी त्याची धास्ती घेतली आहे. त्याचबरोबर कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मागच्या काही दिवसात वातावरणात बदल झाल्यामुळे संसर्गजन्य आजार सुध्दा वाढले आहेत.

नाशिकमध्ये संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली

देशभरात कोरोना व H3N2 चे रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव व परिसरात ताप, थंडी, सर्दी, हातपाय दुखणे व खोकल्याच्या रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शासकीय रुग्णालयाबरोबर खाजगी रुग्णालयात रुग्णाची उपचारासाठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. जरी राज्यात मास्क सक्ती नसलेला पण गर्दीच्या ठिकाणी गरज असेल तरच जा, जातांना मास्कचा वापरा करा,पाणी उकळून गळून प्या तसेच तोंडाला नाकाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याचे आव्हान लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी करत आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील वातावरणात मागच्या काही दिवसांपासून फरक पडला आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण आणि अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे, त्यामुळे संसर्गजन्य आजारांनी पुन्हा डोकेवरती काढले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.