Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू, पिंजरे जंगलात अन् बिबट्याचा वावर शेत शिवारात
केवळ दिंडोरी तालुक्यातच नव्हे तर देवळा आणि सिन्नरमध्येही बिबट्याचा वावर वाढत आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एकाच शेतकऱ्याच्या 4 शेळ्या ह्या ठार झाल्या होत्या. बिबट्याचा मु्क्त वावर सुरु असल्याने ग्रामस्थांना वावरणेही मुश्किल झाले आहे. तर आता दहिवड येथे पहाटे खडकी मळा येथील शेतकरी नामदेव सुकदेव मोरे यांच्या शेत वस्तीतील गोठ्यात बांधलेल्या गाईवर बिबटयाने हल्ला केला असून यात गाईचा फडशा पडला आहे.
मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील देवळा, दिंडोरी तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीच निळवंडी येथे (Leopard attack) बिबट्यांच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतनाच आता देवळी तालुक्यातील दहिवड येथील खडकी मळ्यात दावणीला बांधलेल्या (Cow) गायीचा बिबट्याने फडशा पाडला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी (Forest Department) वनविभागाने पिंजरे सज्ज ठेवले आहेत. मात्र, आतापर्यंत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यामध्ये यश आलेले नाही. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे नुकसान तर होतच आहे पण शेत शिवाराकडे फिरकावे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जनावरे होत आहेत शिकार
केवळ दिंडोरी तालुक्यातच नव्हे तर देवळा आणि सिन्नरमध्येही बिबट्याचा वावर वाढत आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एकाच शेतकऱ्याच्या 4 शेळ्या ह्या ठार झाल्या होत्या. बिबट्याचा मु्क्त वावर सुरु असल्याने ग्रामस्थांना वावरणेही मुश्किल झाले आहे. तर आता दहिवड येथे पहाटे खडकी मळा येथील शेतकरी नामदेव सुकदेव मोरे यांच्या शेत वस्तीतील गोठ्यात बांधलेल्या गाईवर बिबटयाने हल्ला केला असून यात गाईचा फडशा पडला आहे.बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाईच्या मानेवर तसेच पोट व पाया कडील भाग फस्त केला आहे यामुळे शेतकऱ्यांचे अपरीमित नुकसान झाले आहे
वनविभागाकडे मदतीची मागणी
सध्या सबंध मालेगाव परिसरातच बिबट्यांचा मुक्त संचार होत आहे. यामुळे ग्रामस्थांना वावरणेही मुश्किल झाले आहे. तर दुसरी जनावरे ही बिबट्याचा शिकार ठरत आहेत. वन विभागाने पिंजरे तर लावले आहेत पण वनविभागाचा उद्देश मात्र साध्य झालेला नाही. दोन दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात पिंजरे लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आता देवळा तालुक्यातही वन विभागाने काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर यांनी केली आहे.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
केवळ जनावरेच नाहीतर निळवंडी येथे एका शाळकरी मुलाचाही या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. शिवाय सध्या कामे असल्याने रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शेतवस्तीकडे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची भीती असल्याने कामेही रखडत आहेत. वनविभागने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.