उन्हाळा सुरु झाला की उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु होतात. घराच्या छतावर हिरव्या रंगाच्या नेट लावल्या जातात. गॅलरीमध्ये हिरव्या नेटचा वापर केला जातो. कुलर आणि एसी घराघरात सुरु होतात. मग दुपारच्या रणरणत्या उन्हात दुचाकीवरुन बाहेर जाणे टाळले जाते. त्याऐवजी चार चाकी वाहनातून एसी लावून प्रवास केला जातो. परंतु यापेक्षा वेगळा फंडा एकाने लढवला आहे. हा देशी जुगाड चांगलाच यशस्वी झाला आहे. यामुळे गाडी थंड राहत आहे. हा प्रयोग धाराशिव जिल्ह्यात करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहेत. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध पर्याय वापरले जात आहेत. धाराशिव जिल्ह्यातील वैद्य असणाऱ्या नवनाथ दुधाळ यांनी त्यांच्या चारचाकी गाडीला चक्क देशी गाईच्या शेणाचा लेप लावला आहे. या लेपामुळे गाडीचे उन्हापासून संरक्षण होते. शिवाय गाडीच्या आतील वातावरण देखील थंड रहाते. कोणतेही केमिकल न वापरता देशी गाईचे शेण गाडीला लावले असल्याने गाडी वारंवार धुवावी लागत नाही.
कारवर शेणा लावल्यामुळे गाडीचा मूळ रंगही खराब होत नाही. शेण लावल्याने गाडी वारंवार धुवायची गरज नाही पाण्याची बचत होते. उन्हापासून संरक्षणबरोबर गोरक्षणाचा संदेशही यानिमित्ताने दिली जात आहे. देशी गायीचे गोमुत्राचा वापर औषधांमध्ये केला जातो.
तसेच गाईचे शेण शेण गंधक, सोडियम, मँगनीज, झिंक, फॉस्फोरस, नायट्रोजन यासारख्या तत्वांनी परिपूर्ण असते. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या होमहवनमध्ये वापरल्या जातात. तसेच घरात हा गोवऱ्या जाळल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जातात, असा दावा केला जातो.
गायीचे शेण अक्षय स्त्रोत असून ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. गाईचे शेण शेतात शेणखत म्हणून वापरले जाते. गोबर गॅसमध्ये गाईचे शेण वापरता. ग्रामीण भागातील घरे गाईच्या शेणाने सारली जातात. त्यामुळे घरात गारवा राहतो.