भाऊ की भाई? एन्काऊंटरचं श्रेयवाद?, सोशल मीडियावर समर्थकांमध्ये स्पर्धा

बदलापूर एन्काऊंटरवरुन सोशल मीडियात श्रेयाचं वॉर रंगलं आहे. एन्कआऊंटरच्या समर्थनात आणि विरोधात लोक सोशल मीडियात प्रतिक्रिया देत आहेत. फडणवीस आणि शिंदे समर्थकांनी एकमेकांच्या नेत्यांचे बंदुकीसोबतचे फोटो शेअर करुन काय म्हटलं. पाहूयात.

भाऊ की भाई? एन्काऊंटरचं श्रेयवाद?, सोशल मीडियावर समर्थकांमध्ये स्पर्धा
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 10:14 PM

पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ लैंगिक शोषणाचा आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर केल्याचा दावा सरकारनं केला आहे. मात्र प्रकरणाच्या न्यायनिवाड्याआधीच आरोपीला मारुन सरकारनं संस्थाचालकांना वाचवलं का., अशी शंका विरोधकांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस समर्थकांमध्ये आरोपीच्या एन्काऊंटरवरुन आपापल्या नेत्यांना श्रेय देण्याची स्पर्धा रंगली आहे. म्हणजे एकीकडे शिंदे-फडणवीसांचा दावा आहे की, स्वसंरक्षणार्थ पोलिसांना आरोपीवर गोळ्या झाडाव्या लागल्या. पण फडणवीसांचे समर्थक म्हणतायत की लाडक्या बहिणींसाठी आरोपींना तोडतो आणि ठोकतो ते म्हणजे सिंघम देवाभाऊ.

शिंदे समर्थकांनी चिमुकलींना न्याय देणारा असा हवा धर्मवीर म्हणून पोस्टर शेअर केलं आहे. फडणवीस समर्थक म्हणतायत की यूपीत योगी पॅटर्न तसा महाराष्ट्रात फडणवीस पॅटर्न. शिंदे समर्थकांनी म्हटलंय की महाराष्ट्राला आता स्वतः योगीची मिळाले आहेत. कुणी म्हणतंय की देवाभाऊ सुट्टी देत नसतात. हाच न्याय अपेक्षित होता. काहींनी लिहिलंय की देवाभाऊंचा परफेक्ट नेम, गुन्हेगारांचा वाजणार गेम. तिकडे शिंदे समर्थकांपैकी एकानं लिहिलंय की शिंदेंच्या नेतृत्व प्रेरणादायी असून दिलेला वायदा तत्परतेनं निभावलाय. दुसरीकडे देवाभाऊच्या काठीला आवाज नसतो, सिंगम गृहमंत्री म्हणून फडणवीस समर्थक बदलापूर एन्काऊंटरवर प्रतिक्रिया देता आहेत.

आता एन्काऊंटर कसं घडलं. त्याचा घटनाक्रम प्रत्यक्ष घटनास्थळावर उपस्थित पोलिसांनी कसा सांगितला आहे. दोन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात आरोपी अक्षय शिंदे तळोजा तुरुंगात होता. बदलापूर पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कोर्टानं त्याची रवानगी तळोजा तुरुंगात केली होती. म्हणजे आरोपी अक्षयचा ताबा तांत्रिकदृष्ट्या बदलापूर पोलिसांकडे होता. पण काल संध्याकाळी ५ च्या दरम्यान ठाणे क्राईम ब्रांचची एक टीम तळोजा तुरुंगात आली. आरोपीच्या पत्नीनं अक्षयविरोधात याआधी दाखल एका गुन्ह्यासंदर्भात चौकशीसाठी ते पोहोचले होते. ठाणे क्राईम ब्रांचनं बदलापूर पोलिसांच्या ताब्यातून आरोपी अक्षयला स्वतःच्या ताब्यात घेतलं. आणि ४ पोलिसांचं पथक अक्षयला घेवून ठाण्याकडे रवाना झालं. साधारण ६ सव्वा ६ च्या दरम्यान पोलिसांची गाडी मुंब्रा बायपासजवळ पोहोचली.

गाडीच्या मागच्या बाजूला आरोपी अक्षय शिंदे होता. त्याच्या बाजूला एपीआय निलेश मोरे, दुसऱ्या बाजूला कॉन्स्टेबल अभिजीत मोरे आणि आरोपीच्या समोरच्या बाजूला कॉन्स्टेबल हरिश तावडे बसले होते. पुढच्या बाजूला पीआय संजय शिंदे आणि ड्रायव्हर होते. प्रवासादरम्यान मला पुन्हा कुठे नेताय, यावरुन आरोपीनं वाद घातल्याचा दावा पोलिसांचा आहे. त्यामुळे एपीआय संजय मोरेंनी गाडी थांबवून पीआय संजय शिंदेंना मागच्या बाजूला बोलावून घेतलं. पीआय संजय शिंदे आरोपी शिंदेंच्या समोर बसले होते. तेवढ्यात झटापट करुन अक्षय शिंदेनं एपीआय निलेश मोरेंच्या कमरेला खोसलेली बंदूक घेतल्याचा दावा पोलिसांचा आहे. त्याचवेळी मोरेंच्या मांडीला एक तर एक गाडीवर गोळी झाडली गेली. यानंतर समोर बसलेले पीआय संजय शिंदेंनी अक्षयवर गोळी झाडली.

मात्र आरोपी अक्षयच्या हाती बेड्या होत्या की नव्हत्या., जर होत्या तर त्याच्या हातात बंदूक कशी आली. पोलिसाची बंदूक खेचून घेईपर्यंत., दोन गोळ्या झाडेपर्यंत इतर ३ पोलीस गप्प कसे राहिले? आरोपीचा ताबा संध्याकाळी घेण्याचं कारण काय होतं? असे अनेक प्रश्न यावर उपस्थित होत आहेत.

बदलापूरच्या ज्या शाळेत हा प्रकार घडला., त्या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे अद्यापही फरार आहेत. जेव्हा ही घटना घडली त्यादरम्यानचं १५ दिवसांचं शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब झालं आहे. शिवाय फरार आरोपी भाजपशी संबंधित असल्याचा आरोप आहे. सुरुवातीला पोलिसांनीही गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. संस्थाचालकांबद्दल पोलिसांनी घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेवर कोर्टानंही ताशेरे ओढले. मनसे आंदोलकांच्या आरोपांनुसार तक्रारीवेळी शाळेशी संबंधित लोक आणि तक्रार लिहिण्यास टाळाटाळ करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बातचित झाली होती. नंतर त्याच महिला पोलिसाला निलंबितही केलं गेलं.

मात्र या प्रकरणातला सर्वात गंभीर आरोप आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरांच्या याचिकेतून करण्यात आला आहे. तिडोकरांच्या आरोपांनुसार शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी होते. घटनेच्या तपासासाठी हायकोर्टानं मीरा बोरवणकरांच्या नेतृत्वात समिती नेमली होती. आरोपी अक्षय शिंदे वारंवार पोलिसांकडे बोरवणकरांना भेटण्याची इच्छा वर्तवत होता. पण आरोपी समितीपुढे गेल्यास या प्रकरणाला वेगळं वळण लागेल, या भीतीनं अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचा आरोपा याचिकेत केला गेलाय. बडे आरोपी सुटू नयेत म्हणून हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचीही मागणी तिरोडकरांनी केली आहे. तूर्तास एक गट या एन्काऊंटरचं स्वागत करतोय. काहींच्या मते आरोपीला मारुन बड्या लोकांना अभय दिलं गेलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.