धक्कादायकः ऑनलाइन गेममध्ये पैसे हरला, चिमुकल्याच्या कानात दिसली सोन्याची कुंडलं… काय घडलं तुळजापुरात?

ऑनलाइन गेममध्ये पैसे हरलेल्या अल्पवयीन मुलाने या पैशांची भरपाई करण्यासाठी अत्यंत भयंकर प्रकार केल्याचे उस्मनाबादेत उघडकीस आले. विशेष म्हणजे हा गुन्हा दडपण्यासाठी त्याने रात्रभर क्राइम पेट्रोल मालिकाही पाहिली, असे चौकशीत उघड झाले.

धक्कादायकः ऑनलाइन गेममध्ये पैसे हरला, चिमुकल्याच्या कानात दिसली सोन्याची कुंडलं... काय घडलं तुळजापुरात?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 10:30 AM

उस्मनाबादः ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने अल्पवयीन मुलाने (Minor boy) अत्यंत अघोरी कृत्य केल्याचे उस्मानाबादमधील एका गावात उघडकीस आले. या पैशांची भरपाई करण्यासाठी शेजारील मुलाच्या सोन्याच्या कानातल्यांवर त्याचे लक्ष गेले. एवढ्यासाठी त्या चिमुरड्याचा गळा आवळून खून करण्यापर्यंत त्याची मजल केली. आणखी धक्कादायक म्हणजे हा गुन्हा दडपण्यासाठी रात्रभर त्याने क्राइम पेट्रोलची मालिका पाहिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे शुक्रवारी हा गुन्हा उघडकीस आला.

पाच वर्षांचा चिमुरडा अचानक गायब झाला!

पाच वर्षांचा लहानगा सांगवी मार्डी येथील त्याच्या घरातून दुपारी एक वाजेच्या सुमारास गोळी आणण्यासाठी बाहेर पडला होता. पण तो बराच वेळ झाला घरी आलाच नाही. कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता शेजारच्या एका पडक्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी त्याच्या कानातली सोन्याची कुंडलं गायब होती. तसेच अंगावर मारहाणीच्या खुणाही होत्या. कुटुंबियांनी फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संबंधित घटनास्थळाची पाहणी आणि चौकशी करून शेजारील अल्पवयीन मुलगा व त्याच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले.

मेजर वडिलांच्या भीतीने केले कृत्य

पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, या अल्पवयीन मुलाने गेममध्ये हरलेले पैसे भरण्याकरिता एवढे भयंकर कृत्य केल्याचे उङड झाले. या मुलाचे वडील सैन्यात मेजर आहेत. गेममध्ये हरलेल्या पैशांची भरपाई करण्यासाठी वडिलांना पैसे मागतिले असते तर त्यांचा मार खावा लागला असता, मग पैसे आणायचे कुठून या तणावाखाली तो होता. शेवटी त्याला शेजारच्या पाच वर्षाच्या मुलाच्या कानातील सोन्याची कुंडलं दिसली. ती काढण्यासाठी त्याने मुलाचा गळा दाबून जीव घेतला. आपण केलेला गुन्हा लपवण्यासाठी त्याने रात्रभर क्राइम पेट्रोल मालिका पाहिल्याची कबुलीही दिली. त्याच्याकडून पोलिसांनी गळा दाबण्यासाठी वापरलेली लेस आणि सोन्याची कुंडले ताब्यात घेतली.

इतर बातम्या-

मुंबईत 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ऑपरेशन ‘ऑल आऊट’; रस्त्यावर उतरत केली वाहनांची तपासणी

स्वस्त धान्याचा काळा बाजार; मुंबईत गोदामावर छापा, 25 लाखांचा धान्यसाठा जप्त

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.