680 रुपये असलेला बदाम अचानक हजाराच्या वर कसा गेला? अफगाण युद्धाचे परिणाम थेट तुमच्या खिशावर?
मुंबई सुक्या पदार्थांचे भाव वाढले आहेत. अफगाणिस्तानात तख्तापलट होण्यापूर्वी मुंबईत बदामाची किंमत 680 रुपये किलो होते. मात्र, आता अफगाणीस्तानातील बदलांमुळे मुंबईत बदामांची किंमत 1 हजार 50 रुपये किलो झाली आहे. याशिवाय बाजारात काजू, पिस्ता आदींची किंमत वाढली आहे.
मुंबई : तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर आता तिथल्या परिस्थितीचा परिणाम भारतीय बाजारावरही होताना दिसून येतोय. मुंबई सुक्या पदार्थांचे भाव वाढले आहेत. अफगाणिस्तानात तख्तापलट होण्यापूर्वी मुंबईत बदामाची किंमत 680 रुपये किलो होते. मात्र, आता अफगाणीस्तानातील बदलांमुळे मुंबईत बदामांची किंमत 1 हजार 50 रुपये किलो झाली आहे. याशिवाय बाजारात काजू, पिस्ता आदींची किंमत वाढली आहे. येत्या काही दिवसांत हे भाव अजून वाढण्याची शक्या व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात होणाऱ्या घडामोडीचे परिणाम आता थेट तुमच्या खिशावर होताना दिसत आहेत. (Crisis in Afghanistan have a direct impact on lives of the citizens of Maharashtra)
घाऊक बाजारातील ड्रायफ्रुटचे सध्याचे दर (प्रति किलो)
अफगाणी विद्यार्थ्यांची आदित्य ठाकरेंना साद
पुणे आणि मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांनी आज राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांचा आपल्या नातेवाईकांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी भयभीत झाले आहेत. या विद्यार्थ्यांना दिलासा देऊन त्यांना परराष्ट्र मंत्रालयामार्फत नातेवाईकांशी संपर्क करुण देणं आणि महाराष्ट्रात या अफगाणी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबाबत आदित्य ठाकरे आणि विद्यार्थ्यांमध्ये आज चर्चा झाली.
अफगाण विद्यार्थ्यांची मागणी काय?
अफगाणिस्तानातून महाराष्ट्रात एकूण 5 हजार विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत. आम्हाला मदतीची गरज आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहता आम्हाला भारताने आश्रय दिला पाहिजे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. पाकिस्तानच्या पाठिंब्यामुळेच तालिबानने अफगाणीस्तानात प्रवेश केला आहे. आम्ही आदित्य ठाकरे आणि सरकारचे आभारी आहोत. त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला, आमच्या समस्या ऐकल्या. आम्ही सरकारची भेट घेतली कारण आम्ही तालिबानचा विरोध करतो. अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट झाली आहे. महिला सुरक्षित नाहीत. आमचे कुटुंब अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षा मिळू द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
अफगाणी विद्यार्थ्यांच्या मागणी केंद्रात मांडणार – आदित्य ठाकरे
दरम्यान, अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अफगाणी विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकलं. काही विद्यार्थ्यांचा व्हिसा संपत आहे, तर काही विद्यार्थ्यांचा व्हिसा अजून दोन-तीन वर्षांसाठी आहे. व्हिसाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करु. केंद्र सरकारपर्यंत या विद्यार्थ्यांचे प्रश्न पोहोचवणार आहे. 3 हजार 500 ते 4 हजार अफगाणी विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, असं आश्वासन आदित्य यांनी यावेळी दिलंय.
संबंधित बातम्या :
एअर फोर्सचं विमान 120 नागरिकांना घेऊन भारतात दाखल, भारत माता की जयच्या घोषणेनं मायभूमीत स्वागत
Crisis in Afghanistan have a direct impact on lives of the citizens of Maharashtra