राजकारण पेटलेः 93 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का, चंद्रकांत पाटलांचा सवाल
1993 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता. आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते अमरावतीमध्ये बोलत होते.
अमरावतीः 1993 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता. आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते अमरावतीमध्ये बोलत होते.
त्रिपुरातील कथित घटनेवरून गेले दोन दिवस महाराष्ट्र धुमसून निघाला. मालेगाव आणि अमरावतीमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. याता या हिंसाचारावरून राजकारणही पेटले आहे. या दोन्ही ठिकाणी उसळलेल्या दंगलीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. याचाच पुढचा टप्पा आज अमरावतीमध्ये पायाला मिळाला. येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दंगलीवरून थेट सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, भाजप हे सॉफ्ट टार्गेट होतं. काही झालं की भाजपचा हात आहे असं बोललं जातं. परवाच्या तोडफोडीत कोणाचा हात होता, हे ही संजय राऊत यांनी सांगून टाकावं. कालची प्रतिक्रिया हिंदू मार नही खायेगा अशीच होती. ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. 1993 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंसाठी पुढाकार घेतला नसता, तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता, पण आता पण आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का, असा सवालही त्यांनी यावेळी केला. राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करू नये असे आवाहन केले. आपणही तेच आवाहन करत आहोत, असे पाटील म्हणाले. कर्मचाऱ्यांना आत्मदहन हा पर्याय नाही. या आंदोलनातून मार्ग निघेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सहकार मंत्री अमित शहा भेट देणार आहेत. आम्ही खूप व्यापक मनाचे आहोत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर उद्योगात बेसिक संशोधन करणारी इन्स्टिट्यूट आहे. मी सत्तेत असताना ही बराच वेळा भेट दिलीय. अमित शहा हे सहकार मंत्री आहेत. त्यामुळे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देऊ शकतात. त्यात काहीही चुकीचे नाही. ‘व्ही.एस.आय.’ ही काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही. पवारांनी पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली चांगली संस्था आहे. पवारांना शहा भेटले, तर काही चुकीचे नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. (Criticism of Chandrakant Patil if Balasaheb Thackeray was not present in ’93 riots and Hindus were not alive in Mumbai)
इतर बातम्याः
Malegaon हिंसाचारातील 18 संशयितांना बेड्या, 41 जणांवर 5 गुन्हे दाखल
VIDEO: 95 टक्के मुस्लिम प्रामाणिक, 5 टक्के मुस्लिम गडबड करतात; चंद्रकांत पाटलांनी आकडेवारीच दिली
Rajkumar Rao | सेम ड्रेस, फिलिंगही सेम, राजकुमार पत्रलेखाचं अनोखं प्रेम, गुडघ्यावर बसून प्रपोज, पाहा रोमँटिक Videohttps://t.co/dy4nuntZtR#Bollywood| #Patralekha| #rajkumarrao | #weddingdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2021