मंत्र्यांची पुनर्वसन करण्याची वेळ… ठाकरे गटाच्या नेत्याचा तीन मंत्र्यांवर निशाणा
Unmesh Patil: मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसायची आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य न करता त्यांच्या भावनांशी खेळायचे असा उपक्रम राज्यात सुरु आहे. आदिवासी कोळी समाजामध्ये भांडण लावायचे तर धनगर समाजाला एसटी समकक्ष योजना देतो म्हणून घोषणा करायची मात्र अंमलबजावणी करायची नाही.
भारतीय जनता पक्षातून ठाकरे गटात गेलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील तीन मंत्र्यांवर घणाघाती हल्ला केला. या तीन मंत्र्यांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे. जळगाव जिल्ह्यात दुर्देवाने तीन तिघाडा काम बिघाडा, अशी मंत्र्यांची स्थिती आहे. लबाड मंत्र्यांची फौज आहे. जिल्हा दूध उत्पादक संघावर सर्व मंत्री संचालक आहेत. ते दूध उत्पादकांना भाव देत नाही. त्यांना लाजा वाटत नाही, असा हल्ला उन्मेष पाटील यांनी चढवला.
मंत्री गिरीश महाजन यांची मातीशी नाळ राहिलेली नाही. त्यांना पैसांची मस्ती आली आहे. यामुळे त्यांनी शेतकऱ्यांशी नाळ तोडलेली आहे. मंत्री मदत व पुनवर्सन अनिल पाटील त्यांची ना मदत मिळते ना त्यांच्याकडून पुनर्वसन केले जाते. त्यामुळे त्यांचेच पुर्नवसन करण्याची वेळ आली आहे. गुलाबराव पाटील म्हणत होते, शेतकऱ्यांसाठी शिंगाडा मोर्चा काढणार. पण आता सोंग करुन बसले आहेत, आता त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या कळत नाही. जळगाव जिल्ह्यात दुर्देवाने तीन तिघाडा काम बिघाडा, अशी मंत्र्यांची स्थिती आहे, लबाड मंत्र्यांची फौज आहे.
जळगाव जिल्ह्यात कोणी वाली नाही
राज्यातील नंबर दोनचा मंत्री गिरीश महाजन स्वत:ला समजून घेतो. मात्र त्यांच्या पत्राला प्रशासन दाद देत नाही. ज्वारीचे खरेदी केंद्र नाही. जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे प्रशासन ऐकत नाही. यामुळे जळगाव जिल्ह्याला कुणीही वाली राहिलेले नाही, यांच्यात एकाचीही उत्तर देण्याची हिमंत नाही. या शब्दात उन्मेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आणि मंत्री अनिल पाटील यांच्यावर केली आहे.
मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसायची आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य न करता त्यांच्या भावनांशी खेळायचे असा उपक्रम राज्यात सुरु आहे. आदिवासी कोळी समाजामध्ये भांडण लावायचे तर धनगर समाजाला एसटी समकक्ष योजना देतो म्हणून घोषणा करायची मात्र अंमलबजावणी करायची नाही. केवळ सामाजिक तेढ निर्माण करुन राजकीय भाजता येईल का? हा या भाजपचा चेहरा आता उघड झाला आहे. देवेंद्र फडवणीस असो की गिरीश महाजन यांचा चेहरा उघडा पाडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडी लढा देईल. तुम्ही लोकांना न्याय देवू शकत नसाल तर खुर्च्या खाली करा, असे उन्मेष पाटील यांनी म्हटले.