कोकणात मुसळधार पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरुप, मगरींचा रस्त्यांवरुन थाटात वावर, पाहा व्हिडिओ…

Chiplun Crocodile : चिपळूणमध्ये मगरीचा मुक्त संचार रस्त्यावर पाहायला मिळाला आहे. चिंचनाका परिसरातील हे दुष्य खूप व्हायरल झाले आहे. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे या नदीत असणाऱ्या मगरींचा वावर आता रस्त्यांवर होत आहे.

कोकणात मुसळधार पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरुप, मगरींचा रस्त्यांवरुन थाटात वावर, पाहा व्हिडिओ...
Chiplun Crocodile
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 1:21 PM

Chiplun Crocodile : महाराष्ट्र ते केरळ दरम्यान अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकणातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान विभागाने दक्षिण कोकणाला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पावसामुळे कोकणातील नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये मगर रस्त्यावर आल्या आहेत. चिपळूनमधील चिंचनाका परिसरातील मगर रस्त्याने फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

चिपळूणमध्ये मगरीचा मुक्त संचार रस्त्यावर पाहायला मिळाला आहे. चिंचनाका परिसरातील हे दुष्य खूप व्हायरल झाले आहे. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे या नदीत असणाऱ्या मगरींचा वावर आता रस्त्यांवर होत आहे. रविवारी रात्री चिंचनाका येथे एक मगर रस्त्यावर दिसून आली. ही मगर पहिल्यानंतर वाहन धाराकांची देखील चांगलीच बोबडी वळली. त्याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले गेले.

हे सुद्धा वाचा

काय आहे व्हिडिओत

व्हिडिओमध्ये रस्त्यावरुन थाटात मगर चालताना दिसत आहे. या मगरीच्या शेजारुन एक रिक्षावालाही जात आहे. तो आणि इतर काही जण त्या मगरीचा व्हिडिओ काढत आहेत. यापूर्वी मागील वर्षी चिपळूनमध्ये रस्त्यावर मगर आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होत असते. या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

राज्यातील इतर भागांत पाऊस

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस सुरु आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस बरसला आहे. या पावसामुळे अडाण नदीला पूर आला. यामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद झाल्यामुळे दहिफलमार्गे 35 किमी फेर्‍याने जाण्याची वेळ वाहनचालकावर येते.

इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग येथील बुवाची वाडी येथे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका येथील नागरिकांना बसला आहे. याठिकाणी पाणी साठून नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.