शरद पवारांच्या भेटीसाठी इच्छूकांची गर्दी? शरद पवार पुन्हा महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत

विधानसभेच्या आधी शरद पवारांनी महायुतीला धक्के द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान पुन्हा एकदा शरद पवार महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांनी काल शरद पवारांची भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवारांच्या भेटीसाठी इच्छूकांची गर्दी? शरद पवार पुन्हा महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 2:38 AM

महायुतीचे नेते आणि शरद पवारांमधल्या भेटीगाठींचं सत्र सुरुच आहे. भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटलांनी बुधवारी शरद पवारांची भेट घेतली. तसंच बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी महायुतीला धक्के द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान पुन्हा एकदा शरद पवार महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांनी काल शरद पवारांची भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान संजयकाका पाटीलच नव्हे तर इतर राजकीय नेत्यांनी देखील शरद पवारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटलांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली. बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. परळीतून राजेसाहेब देशमुख विधानसभा लढवण्यासाठी इच्छूक आहेत. इंदापूरमधून आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी इंदापूरमधील शिष्टमंडळ बारामतीत पवारांना भेटले.

अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव जगतापांनी देखील घेतली शरद पवारांची माजी आमदार विलास लांडे यांनी देखील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या भेटीमागचा कोणताही राजकीय हेतू नाही.

दोन दिवसांपूर्वी धैर्येशील मोहिते पाटलांनी देखील पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील इच्छूक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली होती. यामध्ये तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत देखील उपस्थित होते. पंढरपूर-मंगळवेढ्यातील इच्छूक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली. मागील काही दिवसांपासून शरद पवार गटात इनकमिंग सुरु झाली आहे.

शरद पवार गटात इनकमिंग सुरु गुरुवारी अजित पवार गटाच्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. समरजित घाटगेंनी देखील भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी फुंकली. सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण मानेंनी देखील धक्का देत तुतारी हातात घेतली होती. बाबाजानी दुर्राणींनी देखील दादांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवार गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु झालीय. दरम्यान मागील काही दिवसात महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतलीय. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा महायुतीला धक्का देणार का? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.