Bhandara Hospital Fire | “माझ्या बाळाला एकदा तरी पाहू द्या”, बाळांच्या आई आणि नातेवाईकांची आर्त हाक

मृत्यू झालेल्या लहान बाळांमध्ये एखादं बाळ अवघ्या 5 दिवसांचं आहे, तर एखादं 15 दिवसाचं. या सर्व बाळांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं.

Bhandara Hospital Fire | माझ्या बाळाला एकदा तरी पाहू द्या, बाळांच्या आई आणि नातेवाईकांची आर्त हाक
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 9:16 AM

भंडारा: जिल्हा शासकीय रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झालाय. तर 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. दरम्यान, मध्यरात्री 2च्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र, या बाळांच्या आई किंवा अन्य नातेवाईकांना आपल्या बाळाला पाहू दिलेलं नाही. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेरच बाळांच्या आई आणि नातेवाईक आक्रोश करत असल्याचं अत्यंत दु:खद चित्र भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाहायला मिळत आहे.(Crying of relatives of babies who died at Bhandara District Hospital)

भंडारा जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री लागलेल्या आगीत १० नवजात बालकांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 7 बाळांना वाचवण्यात यश आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मृत्यू झालेल्या लहान बाळांमध्ये एखादं बाळ अवघ्या 5 दिवसांचं आहे, तर एखादं 15 दिवसाचं. या सर्व बाळांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे बाळाच्या आईला फक्त दूध पाजण्यापूरतंच अतिदक्षता विभागात प्रवेश दिला जात होता. त्यामुळे दिवसभरात फक्त काही तासांसाठी ही बाळं आपल्या आईच्या कुशीत विसावत होती. पण शुक्रवारी मध्यरात्री काळानं घाला घातला आणि लागलेल्या आगीत 10 बाळांचा जीव गेला. आगीची घटना घडल्यानंतर तिथे होत असलेल्या धावपळीमुळं बाळांच्या नातेवाईंकांना घटनेची माहिती मिळाली. पण आपलं बाळ सुखरुप आहे की नाही? याची माहिती मात्र या नातेवाईकांना सकाळपर्यंत कळू शकली नाही.

सकाळी बाळाची आई आणि अन्य नातेवाईकांनी माझ्या चिमुकल्याला मला पाहू द्या, अशी आर्त हाक रुग्णालय प्रशासनाला घातली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेरच या नातेवाईकांनी आपला हंबरडा फोडलाय. पण अद्याप त्यांना आपल्या बाळांना पाहता आलेलं नाही.

आरोग्यमंत्र्यांकडून दुर्घटनेची माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य बाळांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या दुर्घटनेत 3 बाळांचा होरपळून तर 7 बाळांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासनही आरोग्यमंत्र्यांनी दिलं आहे. तसंच बाळांच्या नातेवाईकांना सरकारकडून योग्य ती मदत देऊ, असं आश्वासनही आरोग्यमंत्र्यांनी दिलं आहे.

आरोग्य राज्यमंत्री भंडाऱ्याच्या दिशेनं

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर दुपारपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होतील. दुर्घटनेची माहिती घेऊन याबाबत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्याचबरोबर बाळांच्या नातेवाईकांना बाळांना पाहू देण्यासाठी आपण रुग्णालय प्रशासनाशी बोलणार असल्याचंही यड्रावकर यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

BREAKING | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली

Crying of relatives of babies who died at Bhandara District Hospital

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.