मुंबई ते शिर्डी वंदेभारत आणि मुंबई ते सोलापूर वंदेभारतला नवीन थांबे, पाहा केव्हा पासून होणार अमलबजावणी

मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदेभारत एक्सप्रेसची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी पासून सुरु केली आहे. आता त्यांना नवीन थांबे मिळणार आहेत.

मुंबई ते शिर्डी वंदेभारत आणि मुंबई ते सोलापूर वंदेभारतला नवीन थांबे, पाहा केव्हा पासून होणार अमलबजावणी
Vande_Bharat_ExpressImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 9:42 PM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सीएसएमटी ते शिर्डी वंदेभारत एक्सप्रेसला ( Vande Bharat Express ) कल्याण स्थानकात तर सीएसएमटी ते सोलापूर वंदेभारत एक्सप्रेसला ठाणे स्थानकात प्रायोगिक तत्वावर थांबे देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा फायदा होणार आहे. शिर्डी वंदेभारतला कल्याण स्थानकात थांबा दिला असला तरी दादर स्थानकातील थांबा रद्द केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 4 ऑगस्ट पासून होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने देशभरातील महत्वाच्या शहरांना वंदेभारत या देशाच्या पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेनने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशभरात 25 वंदेभारत एक्सप्रेस चालविण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रातून पाच वंदेभारत चालविण्यात येत आहेत. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदेभारत एक्सप्रेसची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी पासून सुरु केली आहे.

वंदेभारत ट्रेन मुंबई – पुणे – सोलापूर मार्गावर धावते तर दुसरी वंदेभारत ट्रेन मुंबई – नाशिक – साईनगर शिर्डी मार्गावर धावत आहे. आता सीएसएमटी – शिर्डी ट्रेन क्र.22223/24 या गाडीला कल्याण स्थानकात तर सीएसएमटी – सोलापूर ट्रेन क्र. 22225/22226 या ट्रेनला ठाणे स्थानकात 4 ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात येणार आहे.

मुंबई – साईनगर ट्रेन क्र 22223 : सीएसएमटीहून स.6.20 वा. सुटेल आता ती दादरला थांबा घेणार नाही. ती थेट ठाण्याला नेहमीच्या वेळेला स.6.49 वाजता येईल आणि नवा थांबा म्हणून कल्याण स्थानकात स.7.11 वाजता येईल स.7.13 वाजता सुटेल तसेच नाशिक रोड स्थानका स.8.57 वा. पोहचेल आणि स.8.59 वा. सुटेल. परतीची ट्रेन नाशिक रोडला रा.7.25 वा. पोहचेल आणि रा.7.27 वा. सुटेल. कल्याणला रा.9.45 वा. येईल आणि रा.9.47 वा. सुटेल. तर ठाणे स्थानकात रा.10.06 वा.येईल आणि रा.10.08 वा. सुटेल.

मुंबई – सोलापूर ट्रेन क्र. 22225 : हि ट्रेन सीएसएमटीहून दु.4.05 वा. सुटून दादरला दु. 4.15 वा. येईल त्यानंतर दु. 4.17 वा. सुटेल. नंतर नव्या थांबा ठाणे स्थानकांत ही ट्रेन दु.4.33 वा. येईल आणि 4.35 वा. सुटेल. कल्याण स्थानकात 4.53 वाजता येईल आणि 4.55 वाजता पुढच्या प्रवासाला निघेल. तर परतीची ट्रेन कल्याण स्थानकात स.11.33 वाजता येईल आणि स.11.35 वा. सुटेल. ठाणे स्थानकात स.11.50 वा. येईल आणि स.11.52 वा. सुटेल. तर दादर येथे दु.12.12 वा. येईल आणि दु.12.14 वा. सुटेल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.