Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Tauktae Effect: मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, जळगावात दोन बहिणींचा मृत्यू

मराठवाडा, विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी या चक्रीवादळामुळे पावसाला सुरुवात झालीय. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Cyclone Tauktae Effect: मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, जळगावात दोन बहिणींचा मृत्यू
चक्रीवादळ
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 7:46 PM

मुंबई : गुजरात, गोव्याच्या समुद्र किनाऱ्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर तौत्के चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. सोसाट्याचा वारा, जोरदार पाऊस आणि समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा असं चित्र पाहायला मिळत आहे. त्याचवेळी मराठवाडा, विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी या चक्रीवादळामुळे पावसाला सुरुवात झालीय. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात झाड अंगावर पडून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. (Heavy rain and strong winds in Marathwada and some parts of Vidarbha)

परभणी जिल्ह्यात वारा आणि पाऊस

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून वादळी वारं पाहत आहे. आज ढगांच्या गडगडाटासह अनेक भागात पावसानं हजेरी लावली. सकाळपासूनच परभणीत ढगाळ वातावरण होतं. दुपारी 3 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे परभणीच्या हवेत गारवा जाणवला, त्यामुळे मे मधील उकाड्यापासून काही काळ नागरिकांची सुटका झाली. दरम्यान, पावसामुळे हळद शेती आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसंच काही भागात भुईमुगाची काढणी खोळंबली आहे.

जळगावात बहिणींचा मृत्यू

तौत्के चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहू लागलाय. वादळामुळे झोपडीवर झाड कोसळून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडलीय. जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील अंचलवाडी गावात ही दुर्दैवी घटना घडलीय. दुपारी 3 वाजेच्या सुमारास पाऊस आणि वादळामुळे चिंचेचं जुनं झाड कोसळलं. या झाडाखाली आल्याने दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे.

वाशिममध्ये जिल्ह्यात रुग्णालयात पाणी

अचानक आलेल्याला पावसामुळे वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील 31 आणि 32 क्रमांकाच्या वार्डात पाणी घुसलं. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक मोठी तारांबळ झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतागृह आणि रिकाम्या परिसरातून पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाने रुग्णालयात पाणी शिरल्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर उपलोड केलाय. दरम्यान पावसाचं पाणी शिरल्यानं स्वच्छतागृहात आणि परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे रुग्णांच्या आजारात वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिमच्या रुग्णालयात अनेक वर्षांपासून हिच परिस्थिती असून, या गंभीर प्रकारामुळे रुग्णालय प्रशासन जणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय.

नाशिकमध्ये ढगाळ वातावरण

तौत्के चक्रीवादळाचा परिणाम नाशिकमध्येही पाहायला मिळतोय. नाशिकमध्ये आज ढगाळ वातावरण आहे. शहरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. शहरात वारा मात्र कमी आहे. त्यामुळे झाडं किंवा अन्य पडझडीच्या घटना दिसून आल्या नाहीत. दरम्यान, नाशिक जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अकोला जिल्ह्यात पाऊस

तौत्के चक्रीवादळाचा परिणाम अकोला जिल्हातही पाहायला मिळाला. जिल्ह्यातील वाडेगाव इथं जोरदार पाऊस झाला. सलग 20 मिनिटांपेक्षा अधिक वेळ पाऊस कोसळंत होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या :

Tauktae Cyclone: रत्नागिरीच्या देवरुखमध्ये भलमोठं झाडं कोसळलं, तोक्ते चक्रीवादळामुळं वाऱ्यांचा वेग 40 किमी

Tauktae Cyclone : रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावरील 64, तर खाडी किनाऱ्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा

Heavy rain and strong winds in Marathwada and some parts of Vidarbha

MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा.
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला.