महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचा पहिल्यांदाच भगवा फडकवला, आता कलाबेन डेलकर म्हणतात….

विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर कलाबेन डेलकरांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधलाय. शिवसेना परिवार, प्रदेशातील लोकांचं आणि डेलकरांचा आशीर्वाद होता. त्यामुळे मी चांगल्या मताधिक्क्यानं निवडून आली. त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठीच मी उद्धव ठाकरेंना भेटायला आलेय, असंही त्या म्हणाल्यात.

महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचा पहिल्यांदाच भगवा फडकवला, आता कलाबेन डेलकर म्हणतात....
kalaben delkar
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 8:02 PM

मुंबईः दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेने भगवा फडकावलाय. दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी भाजप उमेदवाराचा दणदणीत पराभव करत विजय संपादन केलाय. त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी जात भेट घेतलीय. तसेच शिवसेनेनं निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केलाय. कलाबेन डेलकरांच्या रूपानं दादरा नगर हवेलीत प्रथमच शिवसेनेनं महाराष्ट्राबाहेर लोकसभा जागा जिंकण्याची किमया साधलीय.

मी चांगल्या मताधिक्क्यानं निवडून आली

विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर कलाबेन डेलकरांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधलाय. शिवसेना परिवार, प्रदेशातील लोकांचं आणि डेलकरांचा आशीर्वाद होता. त्यामुळे मी चांगल्या मताधिक्क्यानं निवडून आली. त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठीच मी उद्धव ठाकरेंना भेटायला आलेय, असंही त्या म्हणाल्यात. जे आमचे निवडणुकीचे मुद्दे आहेत ते घेऊन पुढे जाणार आहोत. विकासाचा मुद्दा होता. बेरोजगारीचा मुद्दा होता. तीच आमची पुढची रणनीती असणार आहे. त्याद्वारेच आम्ही पुढे जाणार आहोत. उद्धव ठाकरे लवकरच आमच्या प्रदेशात येणार आहेत, असं त्यांनी आश्वासन दिलंय, याचाही कलाबेन डेलकरांनी आवर्जून उल्लेख केलाय.

अभिनव डेलकर यांच्याकडूनही विजयाबद्दल शिवसेनेचे आभार व्यक्त

तसेच कलाबेन डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनीही विजयाबद्दल शिवसेनेचे आभार व्यक्त केलेत. हा एक ऐतिहासिक आणि लोकशाहीचा विजय आहे. मुख्यमंत्री आमच्यासोबत आहेत. भाजपचे बडे नेते प्रचारासाठी आले होते. परंतु हा प्रदेशचा प्रश्न होता. आम्हाला 30-35 हजार मतांनी विजयी होण्याची अपेक्षा होती. इतक्या मोठ्या विजयाची अपेक्षा नव्हती. आता आमच्यामागे 22 शिवसेना खासदारांची ताकद असल्याचंही अभिनव डेलकर यांनी अधोरेखित केलंय. हुकूमशाहीच्या विरोधात माझे वडील होते. अभी तो ये शुरूआत है…गुजरातमध्ये व दमणमध्येही पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत त्यांनी भाजपला एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न केलाय. हेही वाचा :

दादरा नगरमध्ये भाजप का हरली?, कलाबेन डेलकरांच्या विजयामागचं कारण काय?; शिवसेनेला बळ मिळणार?

देगलूरच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना थेट सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंचा फोन; करेक्ट कार्यक्रमामुळे अभिनंदनाचा वर्षाव!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.