Maharashtra Corona Update | कोरोनाचा विस्फोट सुरुच, महाराष्ट्रात आज 25,681 नवे रुग्ण, 70 रुग्णांचा मृत्यू

राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 25681 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज राज्यात कोरोनामुळे एकूण 70 जणांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra state daily corona update)

Maharashtra Corona Update | कोरोनाचा विस्फोट सुरुच, महाराष्ट्रात आज 25,681 नवे रुग्ण, 70 रुग्णांचा मृत्यू
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 8:42 PM

मुंबई : महाराष्ट्रात विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीये. मागील अनेक दिवसांपासून सातत्याने रुग्णवाढ होत आहे. रुग्णांचा चढता आलेख पाहून राज्यातील आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली असून राज्य सरकारसुद्धा हतबल झाले आहे. राज्यात आज दिवसभरात (daily corona update) कोरोनाचे तब्बल 25681 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज राज्यात कोरोनामुळे एकूण 70 जणांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.42 टक्क्यांवर आले असून मृत्युदर 2.20 टक्क्यांवर आला आहे. (daily corona update of maharashtra state)

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुंबईमध्ये आज दिवसभरात 3063 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर आज एकूण 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आजच्या 3063 रुग्णांना मिळून मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 लाख 55 हजार 914 वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत 11569 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 2872 नवे कोरोना रुग्ण आढळले. पुण्यात दिवसभरात एकूण 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी 13 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या पुण्यात 499 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु आहे. पुण्यात दिवसभरात 808 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुण्यात कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 229383 वर पोहोचला आहे. आज आढळलेल्या नव्या कोरोनाग्रस्तांना मिळून पुण्यात एकूण 18888 रुग्णांवर उपचार सुरु आहे. पुण्यात मृतांचा आकडा 5016 वर पोहोचला असून हा आकडा चिंताजनक असल्याचे म्हटले जातेय.

औरंगाबाद : औरंगाबाद मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 13 हजारांच्या पुढे गेलीये. आज येथे दिवसभरात 1313 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आजचे रुग्ण मिळून औरंगाबाद मनपा क्षेत्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 47 हजार 487 वर पोहोचला आहे. औरंगाबाद शहरात कोरोनामुळे आतापर्यंत 960 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : मनपा क्षेत्रात कोरोनाचे दिवसभरात 552 नवे रुग्ण आढळले आहेत. आजच्या रुग्णांना मिळून ठाण्यात बाधितांचा काकडा 68 हजार 362 वर पोहोचला आहे. ठाण्यात एकूण 1254 बाधिताच्यां मृत्यूची नोंद करण्यात आलीये.

नाशिक : मनपा क्षेत्रात कोरोनाचे एकूण 939 रुग्ण आढळले. दिवसभरात नाशिकमध्ये 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आजची आकडेवारी मिळून नाशिकमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 95 हजार 891 वर पोहोचला आहे. नाशिक मनपा क्षेत्रात आतापर्यंत 1107 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्येसुद्धा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. येथे दिवसभरात कोरोनाचे तब्बल 1324 नवे रुग्ण आढळले आहेत. आजचे रुग्ण मिळून पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 15 हजार 518 वर पोहोचला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 1346 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची सरकार दरबारी नोंद करण्यात आलीये.

नागपूर : नागपूर मनपा क्षेत्रात कोरोनाचे दिवसभरात 2617 नवे रुग्ण आढळले. आज दिवसभरात येथे 4 कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. आजच्या मृतांचा विचार केला तर नागपूर मनपा क्षेत्रात 2799 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

जळगाव : जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 921 नवे रुग्ण आढळले असून आज दिवसभरात 504 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. यथे आज दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला. जळगावात कोरोनामुळे आतापर्यंत 1474 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीये

दरम्यान, राज्यात जवळपास सर्वच शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व जिल्ह्यांत कोरोना प्रतिबंधक नियमांचे कोटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगबाद अशा मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती जास्तच बिकट आहे. खबरदारी म्हणून नागपूरसाऱख्या शहरामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. असे असूनसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये.

इतर बातम्या :

Video | कोरोना लस घेतल्यानंतर आनंद कसा होतो पाहायचंय?, मग हा मजेदार व्हिडीओ नक्की पाहा

Maharashtra Covid-19 New Guidelines | राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी, ऑफिसात 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना

West Bengal Election 2021 Opinion Poll Result: बंगालमध्ये पुन्हा ममता दीदीचच सरकार, भाजप दुसऱ्या नंबरवर; काँग्रेस-डाव्यांचं काय होणार? वाचा सविस्तर

(daily corona update of maharashtra state)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.