Video | जलतरण स्पर्धेआधीच बंधाऱ्याला भगदाड, मोठा अनर्थ टळला
जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील नार नदीवर (River) बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. या बंधाऱ्यात साठवण केलेल्या पाण्याचा पुरवठा आजूबाजूच्या गावांना केला जातो. मात्र या बंधाऱ्याला (Bandhara) अचानकपणे मोठे भगदाड पडल्यामुळे येथे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील नार नदीवर (River) बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. या बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्याचा पुरवठा आजूबाजूच्या गावांना केला जातो. मात्र या बंधाऱ्याला (Bandhara) अचानकपणे मोठे भगदाड पडल्यामुळे येथे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. जलसंधारण विभागाच्या (Department of Water Resources) अधिकाऱ्यांनी अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
पाहा व्हिडीओ :
बंधारा फुटला की फोडला, लोकांना संशय
मिलालेल्या माहितीनुसार या बंधाऱ्यावर जलतरण स्पर्धा होणार होती. या स्पर्धेत अनेक जलतरणपटू सहभागी होणार होते. तासाभरात ही स्पर्धा सुरु होणार होती. मात्र अचानकपणे बंधाऱ्याला भगदाड पडल्यामुळे येथे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, हा बंधारा अचानकपणे फुटला की तो फोडण्यात आला, याबाबत स्थानिक लोक संशय व्यक्त करत आहेत.
इतर बातम्या :
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना ओमिक्रॉनचा कहर, कडक निर्बंध लागणार? अजित पवारांची तातडीची आढावा बैठक
Nashik Corona | उपचाराची बात सोडा, साधा टेस्ट रिपोर्ट चार-चार दिवस मिळेना!