या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र : जुलै महिन्यात महाराष्ट्रातील (maharashtra) काही जिल्ह्यात अतिवृष्टी (heavy rain) झाली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी चांगलीचं वाढली आहे. विशेष म्हणजे काही धरणं पुर्णपणे क्षमतेनं भरली आहेत. त्यामुळे अनेक धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यासह गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने मागच्या काही दिवसात जोरदार हजेरी लावलेली आहे. गोसीखुर्द धरणाच्या (gosikhurd damp) पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून 62 हजार 935 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पुढील 9 तासात धरणातून टप्प्याटप्प्यानं पाणी विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळं नदी काठांवरील नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
भाम धरणासाठी नुकताचं ५१० कोटींचा खर्च करण्यात आलेला आहे. भाम धरणाची निर्मिती फक्त मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी केली आहे. आज हे धरण पूर्णपणे क्षमतेचं भरलं असून तिथल्या नदीला पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे तिथल्या काही गावांना सतर्क राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
मावळात दमदार पडलेल्या पावसाने मावळची तहान भागविणारे पवना धरण काही दिवसात पुर्णपणे भरण्याची शक्यता आहे. पवना नदी पात्रात 1310.02 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर लोकांनी पाण्यात उतरु नये तसेच अत्यावश्यक स्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.