CM Eknath Shinde: मंत्रिमंडळ विस्तारावर पुन्हा तारीख पे तारीख, आता पुन्हा नवी तारीख, सांगण्यात आले हे कारण

गडचिरोली दौऱ्यानंतर रात्री उशिरा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन तासांची याबाबत चर्चाही झाल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र आता राष्ट्रपती निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ वाटप पुन्हा एकदा आठवडाभर लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

CM Eknath Shinde: मंत्रिमंडळ विस्तारावर पुन्हा तारीख पे तारीख, आता पुन्हा नवी तारीख, सांगण्यात आले हे कारण
कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?Image Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 4:53 PM

मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ 30 जूलै रोजी घेतली. त्यानंतर आता 12 दिवस उलटून गेले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) झालेला नाही. सुप्रीम कोर्टात 11 जुलैला बंडखोर आमदारांबाबत सुनावणीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे त्यावेळी सांगण्यात येत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)हे दरम्यानच्या काळात दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेटही घेऊन आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या झालेल्या भेटीत मंत्रिमंडळ वाटपाबाबत चर्चाही झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरला रवाना झाले. आषाढीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल, असे दिल्लीच्या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी सांगितले होते. गडचिरोली दौऱ्यानंतर रात्री उशिरा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन तासांची याबाबत चर्चाही झाल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र आता राष्ट्रपती निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ वाटप पुन्हा एकदा आठवडाभर लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

18 जुलैच्या आसपास होणार मंत्रिमंडळ विस्तार?

18 जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होते आहे. या निवडणुकीसाठी सर्वच आमदार मुंबईत येतील. त्याचवेळी एक दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. 17 किंवा 19 तारखेला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. आमदारांना पुन्हा पुन्हा मुंबईत बोलवायचा खर्च टाळण्यासाठी भाजपचा हा प्लॅन असल्याचं सांगण्यात येते आहे.

मंत्रिपदासाठी तीव्र स्पर्धा

भाजपा आणि शिंदे गटात मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा असल्याचे मानण्यात येते आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाला 27 आणि शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आपल्यालाच मंत्रिपद मिळावे आणि तेही चांगले मिळावे यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत. अनेक आमदार एक दोन दिवसांत एकनाथ शिंदे आणि देवंद्र फडणवीस यांची यासाठी भेटही घेत असल्याचे सांगण्यात येते आहे. आजही संजय शिरसाट आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.  यापूर्वी 13 तारखेला मंत्रिमंडळातील पहिल्या 13 मंत्र्यांचा शपथविधी होईल असे सांगण्यात येत होते. यात भाजपाचे 8 आणि शिंदे गटाचे पाच मंत्री शपथ घेतील असेही सांगण्यात येत होते. आता मात्र 18 तारखेच्या आसपास जो शपथविधी होईल, तो पूर्ण मंत्रिमंडळाचाच होईल, अशी चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.