शिवज्योत आणायला गेलेल्या युवकाचा मृत्यू, भुदरगडाच्या तलावात बुडाला; परिसरात हळहळ
भुदरगडचा तलाव प्राचीन तलाव आहे, त्यामुळे तिथल्या तलावात गाळ्या मोठ्या प्रमाणात आहे, ओमकार पोहत असताना त्याचा पाय गाळात रूतल्याने त्याचा मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
सांगली – सांगली (sangli) जिल्ह्यातील शिराळा (shirala) तालुक्यातील काळुंद्रे आणि पणुंब्रे (panubre) या गावातील किल्ला गड संवर्धन मोहीमेचं आयोजन दोन दिवस केलं होतं. तिथं गेल्यानंतर अनेक तरूणांनी जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर काही तरूण पोहण्यासाठी तिथल्या जवळच्या तलावात उतरले. त्यावेळी अंधोळ करीत असताना ओंकार भिमराव पाटील या तरूणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली असून हा तरूण सांगली जिल्ह्यातील पणुंब्रे गावचा आहे. युवक पाण्यात बुडाल्यानंतर अनेक तरूणांनी तिथं त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तरूणांना त्याला वाचवण्यात यश आले नाही. तसेच तरूण बुडाल्यानंतर साधारण 12 तासांनंतर त्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश त्यांनी सांगितले. तरूणांचा अंत झाल्याची बातमी गावाकडं समजताचं गावात घबराहट पसरली. त्याचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर त्याचं पार्थिव त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं. गावात त्याचा मृतदेह येताचं मोठी गर्दी झाली होती.
गड संवर्धनासाठी गेलेल्या ओमकारचा दुर्देवी अंत
पणुंब्रे गावातील तरूण प्रत्येकवर्षी शिवज्योत गडावरून आणून शिवजयंती साजरी करतात. ते शिवजयंतीच्या निमित्ताने चांगले उपक्रम देखील तिथं राबवतात. तसेच शिवाजी महाराजांच्या मुर्तीची गावातून मिरवणूक देखील काढतात. परंतु काल गड संवर्धनासाठी गेल्यानंतर असा दुर्देवी ओमकारचा अंत झाल्याने गावातला तरूणवर्ग अत्यंत नाराज झाला आहे. दोन्ही गावांनी मिळून ही गड संवर्धन मिळून आयोजन केलं होतं. तिथं गेल्यानंतर काय करायचं हे आगोदर ठरलेलं होतं. परंतु पाण्यात पोहायला गेलेल्या तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. तो गड कोल्हापूर जिल्ह्यात येतो. तसेच त्या गडाला साधारण 12 किलोमीटर पायी चालून अंतर पार करावं लागतं.
तरूणाचा वाचवण्यासाठी पोलिस पाणीबुडीचे तरूणांचे शर्तीचे प्रयत्न
भुदरगडचा तलाव प्राचीन तलाव आहे, त्यामुळे तिथल्या तलावात गाळ्या मोठ्या प्रमाणात आहे, ओमकार पोहत असताना त्याचा पाय गाळात रूतल्याने त्याचा मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. ओमकार जेव्हा बुडाला त्यावेळी तिथं असलेल्या सहका-यांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला, परंतु सोबत असलेल्या तरूणांना अपयश आले. त्यानंतर तरूणांनी पोलिसांनी पाचारण केले. तिथं पोलिसांनी पाहणी करून पाणबुडी देखील मागवली परंतु ओमकार गाळात बुडाल्याने पाणबुडीला देखील अपयश आले. 12 तासांच्या अंतराने त्याचा मृतदेह अखेर सापडला त्यानंतर संबंध भागात दु:ख व्यक्त केलं जाऊ लागलं.