त्र्यंबकबाबा महाराज यांचे निधन, राज्यभरातील भक्त शोकाकुल

राज्यभर भक्त परिवार असणारे, ब्रह्मचर्य स्वीकारून आयुष्यभर हरिनामाच्या (Bhajan,Kirtan) गजरात तल्लीन झालेले सिन्नर (Nashik Sinnar) येथील त्र्यंबकबाबा भगत महाराज (TrimbakBaba Maharaj) यांचे गुरुवारी (9 सप्टेंबर) निधन झाले आहे. त्यामुळे त्यांचा भक्त परिवार शोकाकुल झाला आहे.

त्र्यंबकबाबा महाराज यांचे निधन, राज्यभरातील भक्त शोकाकुल
त्र्यंबकबाबा महाराज
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 2:59 PM

नाशिकः राज्यभर भक्त परिवार असणारे, ब्रह्मचर्य स्वीकारून आयुष्यभर हरिनामाच्या (Bhajan,Kirtan) गजरात तल्लीन झालेले सिन्नर (Nashik Sinnar) येथील त्र्यंबकबाबा भगत महाराज (TrimbakBaba Maharaj) यांचे गुरुवारी (9 सप्टेंबर) निधन झाले आहे. त्यामुळे त्यांचा भक्त परिवार शोकाकुल झाला आहे. (Death of TrimbakBaba Maharaj, mourning to devotees across the state)

त्र्यंबकबाबा महाराज हे ८९ वर्षांचे होते. त्यांचे गुरुवारी पहाटे पाच वाजता निधन झाले. त्यांच्या मागे पुतणे आणि त्यांचे उत्तराधिकारी विलास महाराज भगत, दोन भाऊ, एक बहीण, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्र्यंबकबाबांनी ब्रह्मचर्य स्वीकारून आयुष्यभर हरिनामा गजर आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केले. ते भैरवनाथाचे निस्सीम भक्त म्हणून ओळखले जात. हरितालिकेस बाबांचा जन्मदिवस असतो. दरवर्षी या दिवसाचे औचित्य साधून राज्यभरातील भक्तांची सिन्नरमध्ये रिघ लागते. मात्र, या वर्षी बाबांनी हरितालिकेच्या दिवशीच देह ठेवला. ही बातमी पसरताच सकाळपासून भक्तांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. भैरवनाथ मंदिराशेजारी असलेल्या त्यांच्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

लहानपणी आले अंधत्व

त्र्यंबकबाबा महाराजांना लहानपणी देवीच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांच्या दोन्ही डोळ्यांना दिसत नव्हते. कळायला लागल्यापासून त्यांना आध्यात्माचा ओढा होता. आयुष्यभर अगदी निरपेक्ष भावनेने त्यांनी आपल्यातला भक्तीभाव जपला आणि त्याची रुजवण भक्तपरिवारामध्ये केली. त्र्यंबकबाबा महाराजांनी अनेक लोकोपयोगी कामेही केली. सिन्नरच्या भैरवनाथ मंदिर संकुलाचा जीर्णोद्धार केला. आयुष्यभर आध्यात्मिक मार्गदर्शन केले. अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात आणि आयोजन केले. त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी राज्यभरातील भक्त त्यांच्याकडे येत असत. गुरुवारी दुपारी चार वाजता भैरवनाथ मंदिराशेडारी बागेत बाबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळीही मोठा भक्तपरिवार उपस्थित होता.

भक्त परिवारामध्ये चुटपूट

त्र्यंबकाबाबा महाराज यांचा हरितालिकेला जन्मदिवस असतो. त्यांच्या जन्मदिवशी त्यांचा आशीर्वाद घ्यावा व त्यांना शुभेच्छा द्याव्यात, यासाठी अनेक भक्त सकाळी सिन्नरमध्ये दाखल झाले होते. मात्र, त्यांना बाबांची निधन वार्ता समजताच मोठा धक्का बसला. बाबांनी जन्मदिवशी देह ठेवल्याची दिवसभर चर्चा होती. दर्शनासाठी आलेल्या भक्तांना त्यांचे असे शेवटचे दर्शन घ्यावे लागल्याने चुटपूट लागली होती. (Death of TrimbakBaba Maharaj, mourning to devotees across the state)

इतर बातम्याः

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीने 54 हजार 877 हेक्टरवरील पीक मातीमोल, 7 हजार कोंबड्यांचा मृत्यू

नाशिकमध्ये विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर करत घातला २१ लाखांचा गंडा

ताशाचा आवाज तरारा झाला रं, गणपती माझा नाचत आला!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.