बापरे! मंत्रिपदासाठी केसरकरांनी ठाकरेंना 1 कोटींचा चेक दिलेला? मंत्र्यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या एका आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. "मी उद्धव ठाकरे यांना 1 कोटींचा चेक दिला होता", असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

बापरे! मंत्रिपदासाठी केसरकरांनी ठाकरेंना 1 कोटींचा चेक दिलेला? मंत्र्यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 9:36 PM

सिंधुदुर्ग | 7 फेब्रुवारी 2024 : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. “उद्धव ठाकरे यांच्याकडे मी 1 कोटींची चेक दिला होता”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. “मंत्रिपदासाठी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे माहिती नाही”, असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “मी 1 कोटी रुपयांचा चेक दिला होता. पण मंत्रिपदाच्या आगाऊ दिले नव्हते. त्यामुळे पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रीपद?”, असा सवाल दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी दीपक केसरकर यांच्याकडे मंत्रिपदासाठी तब्बल 1 कोटी रुपये घेतले होते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. दुसरीकडे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर यांचे आरोप फेटाळले आहेत.

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?

“हे बघा मी चेक दिला. चेक दिल्याचा रेकॉर्ड असतो. मी एक कोटीचा चेक दिला आहे. याबाबत मी पत्र दिलं होतं. आता मंत्रिपदासाठी पैसे मागितले की निवडणुकीसाठी हे मी सांगू शकत नाही. पण ज्यादिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला की, कोकणातून कोण मंत्री असणार? त्यावर आदित्य ठाकरेंनी दीपक केसरकर यांच्याशिवाय आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरं कोणतं नाव नाही. पण त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केली नाही. याचा अर्थ काय होतो? कमिटमेंट म्हणजे काय? पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रीपद? पक्षासाठी पैसे लागतात. ते चेकने देण्यात कुठलंही कमीपण नाही. ते अलाउड आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले.

“तुम्हाला माहिती आहे की, मोपा येण्यापूर्वी सिंधुदुर्गात काय भाव होते. सिंधुदुर्गात माझ्या वाड-वडिलांनी कमावलेल्या या जमिनी आहेत. त्या मी फुकट, त्यांना पैसे पाहिजेत म्हणून वाटू शकत नाही. मंत्री नसलो म्हणून मला काही फरक पडत नाही. कारण आमच्या वाड-वडिलांनी जमिनी घेताना घाम गाळले आहेत. त्यांनी तेव्हा उद्योग सुरु केले म्हणून ही श्रीमंती आहे. माझी श्रीमंती कमी होतेय. मी महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे ज्याची श्रीमंती दर पाच वर्षाला कमी होतेय”, असं केसरकर म्हणाले.

‘एवढं खोटं बोलून हे लोकं स्वत: आरशात कसं बघतात?’

दीपक केसरकर यांच्या या आरोपांबाबत आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. आदित्य ठाकरेंनी हे आरोप फेटाळले आहेत. “मला वाटतं खोट्या लोकांकडे किती लक्ष दिलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. एवढे खोटं बोलून अशा लोकांवर कसा विश्वास ठेवायचा? एवढं खोटं बोलून हे लोकं स्वत: आरशात कसं बघतात? हा मला प्रश्न पडतो”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीय

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.