दीपक केसरकर भाजपमध्ये जाणार?, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा दावा काय

सुषमा अंधारे म्हणाल्या, जहाज डुबण्याची आशंका निर्माण झाल्यावर पहिल्यांना उंदरं बाहेर उड्या मारतात.

दीपक केसरकर भाजपमध्ये जाणार?, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा दावा काय
दीपक केसरकर, सुषमा अंधारे
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 8:33 PM

मुंबई – शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे भाजपमध्ये जाणार, असा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. दीपक केसरकर यांनी सत्तेसाठी मांडवली केली होती, असा आरोपही अंधारे यांनी केलाय. शिंदे गटामध्ये असलेले काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं अंधारे यांनी म्हटलंय. केसरकरांना काय शत्रू माणायचं, ज्य़ा माणसासोबत १०० कार्यकर्ते नसतात, त्याला आपण स्पर्धक म्हणायचं का?, त्याच्यासोबत कार्यकर्ते कमी आणि पोलीस जास्त असतात, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, जहाज डुबण्याची आशंका निर्माण झाल्यावर पहिल्यांना उंदरं बाहेर उड्या मारतात. दीपक केसरकर यांचं वागणं, बोलणं आतापर्यंत बघत आली आहे. त्यानुसार, न्यायालयनी पेचप्रसंग निर्माण झालेत. ते पाहता दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबतही थांबणार नाहीत.

दीपक केसरकर हे सर्वात प्रथम भाजपकडं उडी मारणार. त्यामुळं इथं शिवसेनेचा माणूस असेल आणि इथं शिवसेनाचं दिसेल तुम्हाला, असंही सुषमा अंधारे यांनी ठामपणे सांगितलं.

सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अंधारे म्हणाल्या, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एक कार्यक्रम पार पडला. पण युतीची चर्चा काही झाली नाही. अर्थात युती करावी की नाही हा माझ्या वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय़ आहे. परंतु, आमच्याकडे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अद्याप प्रस्ताव आला नाही. ढसाळ पँथर हे शिंदे गटासोबत जाणार नाहीत. ढसाळच्या पँथरचे सचिव आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं माझं बोलणं झालं आहे. २५ तारखेला एकत्र भेटत आहोत, असंही अंधारे यांनी सांगितलं. मी कधीच बोललेला शब्द परत घेत नाही. सुषमा अंधारे सत्तेसाठी शिवसेनेत आलेली नाही. मी कुठेतरी बोलण्यात अडकते का याचा ते भरपूर प्रयत्न करीत आहेत, असंही त्या म्हणाल्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.