मुंबई : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली आहे. बंडखोरी करत त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेलाच अंगावर घेत आवाहन दिले आहे. दरम्यान शिंदे यांना किमान 35 आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात असून हे सर्व आमदार आणि स्वत: शिंदे हे आसामची राजधानी गुवाहटी येथे गेले आहेत. शिंदे यांच्या बंडातील नाराजी नाट्याचा पडदा हा विधानपरिषदेच्या निकालानंतर उठला आणि त्यांनी आपले सहकारी आमदार घेऊन सुरत गाठली. त्यानंतर हे नाट्य थांबावं म्हणून शिवसेनेकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. तर शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी कट्टर शिवसैनिक सोशल मिडियाचा आधार घेत आहेत. ते सोशल मिडियाच्या माध्यमातून शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी करू नका असे आवाहन करताना दिसत आहेत. त्याचदरम्यान सेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Syed) यांनी देखिल असाच आवाहन शिंदेसह मुख्यमंत्री ठाकरे यांना केले आहे. जे सध्या चांगलेच व्हायरल होत असून त्याची चर्चा ही होत आहे.
माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे.
आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल. @ShivSena
एकनाथ शिंदे यांनी सेनेत आपला मान राखला जात असून महाविकास आघाडी सरकारमध्ये मध्ये माझ्यासह शिवसेनेच्या आमदारांची घुसमट होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच यातून आता बाहेर पडावे. तर पुन्हा भाजपसह युती करावी. हवं तर मला मंत्रीपद देऊ नका असेही शिंदे यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान सेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्वीट केले आहे. तसेच या ट्वीटमधून त्यांनी शिंदे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल.
माननीय.एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणनार्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही. @ShivSena
दरम्यान दिपाली सय्य्द यांनी याच्या आधीही एक ट्वीट केलं होतं. ज्यात त्यांनी, माननीय एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणनार्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही. असे म्हटलं होतं.