महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, महाबैठकीआधीच एकनाथ शिंदे-अमित शाह यांची बैठक, काहीतरी मोठं घडतंय

महाराष्ट्रातील महायुती सरकार स्थापनेसाठी दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर, अमित शाह यांच्या निवासस्थानी अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होत आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाची घोषणा आणि खातेवाटपाचा निर्णय अपेक्षित आहे. राज्याचे भवितव्य या बैठकीवर अवलंबून आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, महाबैठकीआधीच एकनाथ शिंदे-अमित शाह यांची बैठक, काहीतरी मोठं घडतंय
एकनाथ शिंदे आणि अमित शाह
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 10:17 PM

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिशय मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागांवर यश आलं आहे. असं असलं तरीही महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी पेच निर्माण झालेला बघायला मिळाला. अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. पण शिंदेंना गृहखातं हवं असल्याची चर्चा आहे. सत्ता स्थापनेच्या पेचावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी आज महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे.

अमित शाह यांच्या निवासस्थानी आज रात्री उशिरा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार आज सकाळीच दिल्लीत दाखल झाले. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी दिल्लीत दाखल झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत राष्ट्रवादीच्या इतर प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट

या सर्व घडामोडी सुरु असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारी घटना घडताना दिसली. देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकीकडे बैठक सुरु असताना रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले. एकनाथ शिंदे हे दिल्ली  विमानतळाहून थेट अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याआधी अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दाखल झाले होते. नड्डा आणि शाह यांच्यात बैठक सुरु होती. या दरम्यान एकनाथ शिंदे तिथे पोहोचले. यानंतर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीनंतर अमित शाह यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत एकत्र बैठक होणार असल्याची माहिती आहे.

बैठकीत खातेवाटपही होणार?

महायुतीच्या आजच्या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच गृहखात कुणाला द्यायचं? याबाबतही मोठा खुलासा होणार आहे. आजच्या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. कोणत्या पक्षाला कोणत्या खात्याचं मंत्रिपद द्यावं, ते ठरणार आहे. त्यामुळे या खातेवाटपाकडे आणि मुख्यमंत्रीपदासाठी कुणाचं नाव निश्चित होतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.