Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या डेल्टा प्लसने धाकधूक वाढवली, संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये, आता वाचा काय बंद, काय सुरु?

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर द्वारे होणाऱ्या चाचण्यांचा पॉझिटीव्हीटी रेट लक्षात घ्यावा लागणार आहे.

कोरोनाच्या डेल्टा प्लसने धाकधूक वाढवली, संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये, आता वाचा काय बंद, काय सुरु?
Corona
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 10:37 PM

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात डेल्टा प्लस प्रकाराची लागण झालेले 21 रुग्ण आढळून आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं. आहे. अशावेळी आज दिवसभरात राज्यात 9 हजार 677 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 10 हजार 138 जणांनी कोरोनावर मात केलीय. राज्यात दिवसभरात 156 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर 1 लाख 20 हजार 715 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. (Third level restrictions apply in Maharashtra because of Delta Plus Corona variant)

डेल्टा प्लसमुळे राज्यात तिसल्या टप्प्यातील निर्बंध

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर द्वारे होणाऱ्या चाचण्यांचा पॉझिटीव्हीटी रेट लक्षात घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तिसऱ्या लेवलपेक्षा कमी म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करायचे असतील तर त्यांना मागील दोन आठवड्यातील कोरोना रुग्णसंख्येचा अभ्यास करावा लागेल. जर कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीय असं दिसत असेल तर वरील टप्प्यातील निर्बंध लागू करावे लागतील.

तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध

1. अत्याआवश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. 2. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. 3. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील. 4. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल. 5. 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील. 6. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. 7. स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. 8. मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. 9. लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. 10. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. 11. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल. 12. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

डेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.

नव्या वेरियंटवर लस प्रभावी आहे का?

आपण आतापर्यंत वापरत असलेली लस वेरियंटवर प्रभावी आहे. बर्‍याच वेळा अशा प्रकारे अनुवांशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. सार्स कोरोना व्हायरस (Sars Cov 1) अशाप्रकारे संपला होता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतो, असं म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस घ्यावी.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, प्रमाण 0.005 टक्के, पण गुणधर्म चिंताजनक – राजेश टोपे

Maharashtra Unlock: संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये , कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय

Third level restrictions apply in Maharashtra because of Delta Plus Corona variant

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.