Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्या यांचा तो व्हिडिओ पाहणं म्हणजे….’, निलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
Maharashtra Monsoon Session 2023 | अंबादास दानेव यांनी व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह उपसभापती निलम गोऱ्हे यांना दिला आहे. हा व्हिडिओ कोण पाहणार? ते सुद्धा निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.
मुंबई : आज विधिमंडळात किरीट सोमय्या यांचा मुद्दा गाजला. याच विषयावरुन विरोधकांनी सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही वृत्त वाहिन्यांवर हा व्हिडिओ दाखवला जात आहे. किरीट सोमय्या यांचा मुद्दा गाजणार हे निश्चित होतं. आज विधिमंडळाच्या सभागृहात जोरदार पडसाद उमटले. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची वरिष्ठ पातळीवरुन सखोल चौकशी होईल, असं जाहीर केलं.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि अनिल परब सभागृहात या कथित व्हिडिओवरुन आक्रमक झाले. “अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे” असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
व्हिडिओवर निलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
सभागृहात या विषयावर चर्चा सुरु असताना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांना काय चिंता वाटते, ते सांगितलं. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी जाहीर केली. पण एक अस्वस्थ करणारा मुद्दा आहे, तो म्हणजे दोन-तीन वाहिन्यांवर वारंवार हे शॉट्स दाखवले जात आहेत. मी विनंती करीन, हे सरकारने करावं अस म्हणणार नाही. आलेला व्हिडिओ ब्लर करता येतो., पण काय कृत्य चाललय ते वारंवार दाखवलं जातं. मला असं वाटतं व्हिडिओ दाखवताना थोडफार बंधन ठेवाव” असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.
कोण पाहणार हा व्हिडिओ?
“पोलीस तपास होईल, त्यावेळी वाहिन्यांनी माहिती गोपनीय स्वरुपात द्यावी, जेणेकरुन पीडित महिलेपर्यंत पोहोचण शक्य होईल. तुम्ही पेनड्राइव्ह दिला, तो बघणं म्हणजे खूप कठीण परिक्षा आहे. पण, मी महिला पोलिस अधिकारी, महिला डॉक्टर यांना तो व्हिडिओ बघायला सांगून त्यांचं मत घेईन. हे तपासून त्यातून निघणार काय आहे?” असा सवाल निलम गोऱ्ंहे यांनी उपस्थित केला. “त्या महिलेची तक्रार आली पाहिजे. ती भगिनी कोणी ऐकत असेल, तर तिने सभागृहावर विश्वास ठेवावा. लोकांचा विश्वास आपल्यावर आहे. या विश्वासाचा घात होत असेल, तर त्यावर गृहमंत्र्यांनी जाहीर केलेली चौकशी महत्वाची आहे” असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.