शिंदे-फडणवीस मुंबईत असताना दिल्लीत मोठ्या घडामोडी, अजित पवार आणि अमित शाह यांच्यात एक तास चर्चा

अजित पवार यांनी अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे-फडणवीस मुंबईत असताना दिल्लीत मोठ्या घडामोडी, अजित पवार आणि अमित शाह यांच्यात एक तास चर्चा
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 11:28 PM

नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सातत्याने चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून या तीनही नेत्यांमध्ये रात्री उशिरा बैठका पार पडल्या आहेत. पण तरीही मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर शिक्कामोर्तब झालेलं नसल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान आज अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील बैठकीसाठी गेल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि अमित शाह यांच्यात एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली आहे. या बैठकीत कदाचित मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता असू शकते. पण ही औपचारिक आणि राजशिष्टाचार म्हणून भेट होती, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

शिंदे-फडणवीस सध्या मुंबईत

विशेष म्हणजे अजित पवार आज दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी आले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या मुंबईतच आहेत. अजित पवार दिल्लीत दाखल झाले तेव्हा शिंदे आणि फडणवीस हे मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीमध्ये व्यस्त होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, अजित पवार आणि अमित शाह यांच्या बैठकीतून नेमकं काय फलित निघतं हे आता लवकरच स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा तिढा सुटणार?

अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा तिढा सुटणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.  शिवसेनेकडून अजित पवार यांना अर्थखातं देण्यास विरोध होतोय, अशी चर्चा आहे. तसेच आमदार भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. आपण मंत्री होणारच त्यासोबत रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा भरत गोगावले यांनी केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीला अर्थ खात्यासह ग्रामविकास आणि सहकार खातं देखील हवं असल्याची चर्चा आहे. पण हे दोन्ही खाती सध्या भाजपकडेच आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास खातं आहे. तर मंत्री अतुल सावे यांच्याकडे सहकार खातं आहे. त्यामुळे भाजप आपल्याकडील ही खाती राष्ट्रवादीला देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.