कोरोनामुळे नाट्यक्षेत्र अडचणीत, नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करा, अजित पवारांचे आदेश
या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्यचळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यसरकार सकारात्मक असल्याचे सांगितले (Deputy CM Ajit Pawar orders immediate disbursement of grants to theater companies as earliest)
मुंबई : नाट्यक्षेत्र हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या नाट्यक्षेत्राला मदतीचा हात देणे आवश्यक आहे. यासाठी नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. नाट्यनिर्माते आणि नाट्यचळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यसरकार सकारात्मक भूमिका घेईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. (Deputy CM Ajit Pawar orders immediate disbursement of grants to theater companies as earliest)
राज्यातील नाट्यनिर्माते आणि नाट्य चळवळीसमोरील समस्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्यचळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यसरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.
नाट्यकलावंतांना शासकीय विश्रामगृहात सवलतीसह प्राधान्य द्या
मराठी माणूस नाटकवेडा आहे. महाराष्ट्राची नाट्यचळवळ राज्याचे सांस्कृतिक वैभव आहे. राज्यातील नाट्यक्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यसरकार नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. शासकीय नाट्यगृहात नाट्यप्रयोग आणि नाटकांच्या तालमींसाठी नाट्यसंस्थांना भाडे सवलत, प्रयोगांसाठी आलेल्या नाट्यकलावंतांना शासकीय विश्रामगृहात सवलतीसह प्राधान्य द्यावे, अशी सूचना अजित पवारांनी केली.
तसेच नाट्यसंस्थेच्या बसेस, टेम्पोंना टोल नाक्यांवर टोलमाफी, बस-टेम्पो पार्कींगसह नाटकाचे सेट (संच) ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करणे इत्यादी मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहे, असे अजित पवार म्हणाले.
विजेत्यांना बक्षिसांसह सवलती देण्यात याव्यात
प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांच्या स्पर्धा आयोजित करुन विजेत्यांना बक्षिसांसह सवलती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. नाट्यनिर्मात्यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनेते प्रशांत दामले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. (Deputy CM Ajit Pawar orders immediate disbursement of grants to theater companies as earliest)
हिंगोली जिल्ह्याला केंद्राकडून 70 कोटींचा निधी; ग्रामपंचायतींमध्ये वाटपाला सुरुवात https://t.co/vFf3uwphWV #Maharashtra #Hingoli #Grampanchayt
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2021
संबंधित बातम्या :
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज निश्चित
“14 दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी सरकारला भीती”
बारमध्ये गर्दी चालते, कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको; फडणवीस संतापले