राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे 2 डोस पूर्ण करा, उपमुख्यमंत्र्यांची सूचना

सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे 2 डोस पूर्ण करा, उपमुख्यमंत्र्यांची सूचना
ज्या मोदी सरकारच्या निर्णयाला अजित पवारांनी विरोध केला, आता त्यांच्यावरच 'सुधारणे'ची जबाबदारी
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 2:50 PM

मुंबई : राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल, असेही अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar’s instructions to teachers and non-teaching staff to complete both doses of corona vaccine)

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे त्यामुळे केंद्रसरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या भागात पंचनाम्याचे आदेश

मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्या – त्या जिल्हयाचे पालकमंत्री घटनास्थळी पोचले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शिवाय जमीनी खरवडून निघाल्या आहेत. तर काही भागात घाट कोसळून वाहतूक ठप्पही झाली होती. याबाबत कालच कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या – त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी या सगळ्या नुकसानीची पाहणी करत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

शाळा सुरु करण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय – बच्चू कडू

महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे, मात्र इतर राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, असंही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. शाळा सुरु करण्यासाठी टास्क फोर्सच्या सूचना लक्षात घेऊन एसओपीत बदल केल्यानंतर नवी कार्यप्रणाली जाहीर केली जाणार आहे. तसंच काल सीबीआय ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला कुठलीही नोटीस न देता ताब्यात घेतलं. त्यामुळं भाजप ईडी आणि सीबीआयचा वापर करत असल्याचं स्पष्ट झालंय, असाही आरोप बच्चू कडू यांनी केला.

शिक्षकांच्या लसीकरणासाठी मोहीम

शिक्षकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबवणार आहे. 5 तारखे पर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत स्पेशल ड्राईव्ह घेणार असल्याचे राजेश टोपे 29 ऑगस्ट रोजी म्हणाले होते. राज्यातील काही जिल्हे आणि शाळा जिथे पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत त्या बाबत टास्क फोर्सचा शाळा आणि जिल्हे सुरू करण्याबत विचार सुरु आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांचं लसीकरण करुन घेणं आवश्यक असल्यानं यासंदर्भात राज्य सरकारकडून पावलं टाकण्यात येत आहेत.

इतर बातम्या :

देशमुख तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचा हार टाकून स्वागत करायचं का? : चंद्रकांत पाटील

मग तुम्ही अरुण जेटलींना राज्यसभेवर कसं घेतलं, राजू शेट्टींबाबतच्या तांत्रिक मुद्यावर अजित पवारांचं प्रश्नचिन्ह!

Ajit Pawar’s instructions to teachers and non-teaching staff to complete both doses of corona vaccine

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.