Ajit Pawar | अजित पवार-भाजपात ठरलं! लोकसभा-विधानसभेसाठी असा असेल जागा वाटपाचा फॉर्म्युला

Ajit Pawar | अजित पवार यांनी भविष्याच्या दृष्टीने पावल उचलण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला कुठल्या भागात जास्त जागा मिळतील? राष्ट्रवादी काँग्रेससमोर मुख्य टार्गेट काय असेल? हे निश्चित झालं आहे.

Ajit Pawar | अजित पवार-भाजपात ठरलं! लोकसभा-विधानसभेसाठी असा असेल जागा वाटपाचा फॉर्म्युला
Ajit pawar-Devendra fadnavisImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 8:50 AM

मुंबई : मागच्या आठवड्यात राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी भूकंप घडवून आणला. समर्थक आमदारांसह अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहेत. अजित पवार यांचा गट सरकारमध्ये सहभागी झाला आहे, तर शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात आहे. दोन्ही गट पक्षावर दावा सांगतायत. आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस आहोत, असं दोन्ही गटांच म्हणणं आहे.

अजित पवार गटाकडे 40 पेक्षा जास्त आमदारांच समर्थन आहे. पक्षांतर्गत बंड करताना अजित पवार समर्थक आमदारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आलं होतं.विधिमंडळात तसेच संघटनात्मक पातळीवर दोन्ही गटांनी परस्परांच्या नियुक्त्या रद्द करुन नव्याने नियुक्त्या केल्या आहेत.

अजित पवार यांच्याकडून भविष्याच्या दृष्टीने पावल उचलण्यास सुरुवात

आपण सर्व कायदेशीर बाबींचा विचार करुनच हे पाऊल उचललय. त्यामुळे आमच्या आमदारकीला कुठलाही धोका नाही, असं अजित पवार समर्थक आमदारांच म्हणणं आहे. दरम्यान महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी भविष्याच्या दृष्टीने पावल उचलण्यास सुरुवात केली आहे.

जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

अजित पवार आणि भाजपा यांच्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेच्या 13 आणि विधानसभेच्या 90 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 आणि विधानसभेच्या 288 जागा आहेत.

राष्ट्रवादीला कुठल्या भागात जास्त जागा मिळणार?

दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी विधानसभेच्या 90 जागा लढवणार असल्याच म्हटलं होतं. अजित पवार यांच्यासोबत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना विदर्भ आणि शहरी भागात भाजपा तर ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळू शकतात. जिथे काँग्रेस बळकट आहे, त्याठिकाणी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळू शकतात. चंद्रशेखर बावनकुळे यांचं काय म्हणण?

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस 90 जागा लढवणार असल्याच म्हटलं होते. त्यावर बावनकुळे गुरुवारी म्हणाले की, “जागांबद्दल काय बोलण झालं? काय नाही? हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतु निवडणूका लागत नाही, तो पर्यंत जागा वाटपाचा निर्णय होत नाही. साधराण युतीमध्ये असं असंत” “आम्ही म्हटलं इतक्या जागा लढू, एकनाथ शिंदे म्हणाले, इतक्या जागांवर लढू पण खरं चित्र हे निवडणुका लागल्यानंतरच स्पष्ट होतं. त्यामुळे राष्ट्रवादी 90 जागा लढवणार हे माझ्या दृष्टीने महत्वाच नाही” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.