Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य, VIDEO

Kirit Somaiya | सभागृहात किरीट सोमय्याच्या व्हिडिओवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?. आज विधिमंडळाच्या सभागृहात या कथित व्हिडिओचे पडसाद उमटले. अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी सभागृहात हा विषय लावून धरला.

Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य, VIDEO
devendra fadnavis-Kirit Somaiya
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 2:29 PM

मुंबई : भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. हा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाहिन्यांवर हा व्हिडिओ दाखवला जात आहे. सहाजिकच आज विधिमंडळाच्या सभागृहात या कथित व्हिडिओचे पडसाद उमटले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी सभागृहात हा विषय लावून धरला.

त्यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी सभागृहातील चर्चेला उत्तर देताना महत्वाची घोषणा केली आहे.

‘पुण्याई पणाला लागते’

“अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे. त्यांनी ज्या भावना मांडल्या, त्याच्याशी मी सहमत आहे. राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात, ज्यावेळी माणसाच संपूर्ण राजकीय आयुष्य, पुण्याई पणाला लागते” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“हा प्रकार समोर आलाय. आपल्या काही तक्रारी असतील, तर आम्हाला द्या. गृहितिकांच्या आधारावर चौकशी होत नाही. काही ठोस असेल तर आमच्याकडे द्या आम्ही त्याची सखोल चौकशी करु. कोणाला पाठिशी घालणार नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

‘या केसपुरता ओळख जाहीर होणार’

“कोण महिला आहे, ती ओळख उघड करता येत नाही. या केसपुरता ती ओळख पोलिसांना सांगितली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून शोधून काढतील. अशी आयडेंटी ओळख जाहीर करता येत नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “या प्रकरणात काही दबाव येणार नाही, काही लपवा-छपवी होणार नाही. याची अतिशय वरिष्ठ पातळीवर, सखोल चौकशी केली जाईल” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.