कोणकोणत्या जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी?, वाचा सविस्तर रिपोर्ट

काही जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रात्रीची संचारबंदी आहे, हे जाणून घेऊयात. (district night curfew information)

कोणकोणत्या जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी?, वाचा सविस्तर रिपोर्ट
नाईट कर्फ्यू
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 7:18 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढ आहेत. बऱ्याच महिन्यांनी कोरोनाने डोके वर काढल्यामुळे आरोग्य प्रशासन तसेच राज्य सरकार अलर्टवर आहे. सरकारकडून कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी कोरोना संसर्गाला नागरिकांनी अद्यापही गांभीर्याने घेतले नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन स्थानिक जिल्हा प्रशासनांनी वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. सध्या काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रात्रीची संचारबंदी आहे, हे जाणून घेऊयात. (detail information of all district in which night curfew is implemented)

सातारा :

गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, अशा सूचना येथील प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहेत. मात्र, असे असूनसुद्दा कोरोनाला थोपवण्यात म्हणांव तेवढं यश आलेलं नाही. त्यामुळे येथे रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संचारबंदीदरम्यान जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांना वगळण्यात आलेय. आगामी काळात यात परिस्थितीनुसार बदल करण्यात येतील.

नाशिक :

नाशिक शहरात कोरोना रुग्णांच्या सख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात 21 फेब्रुवारी पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत ही संचारबंदी असणार आहे. याविषयीची अधिकृत घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. येत्या आठ दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही, तर नाशिक शहरात कडक निर्बंध लागू करणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितलेले आहे.

पुणे :

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या जिल्ह्यात कोरोना संसर्ग गावपातळीपर्यंत पोहोचला आहे. अनेक तालुके कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान येथे शाळा, कॉलेज, खासगी शिकवणी हे सर्व बंद असतील.

वाशिम :

वाशिम जिल्ह्यातील कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी यापूर्वी वेळोवेळी आदेशात बदल करण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहतील. प्रत्येक आठवड्यात शनिवारी सायंकाळी 5 ते सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार असून या काळात सर्व, दुकाने आस्थापना बंद राहतील. मात्र, या काळात दूध विक्रेते, डेअरी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील.

अकोला :

अकोला जिल्ह्यात 19 फेब्रुवारीपासून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच येथे रविवारी लॉकडाऊन राहणार असून पुढील आदेशापर्यत रात्रीची संचारबंदी कायम असणार आहे. अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून वगळण्यात आले. असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्याबाबत निर्देश दिले आहेत.

इतर बातम्या :

कोरोना लसीच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह? लस घेऊनही IAS कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह, उस्मानाबादेत खळबळ

Video : ‘मी लस घेतली, तुम्हीही घ्या’, व्हिडीओ जारी करत विश्वास नांगरे पाटील यांचं आवाहन

(detail information of all district in which night curfew is implemented)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.