महापुराच्या संकटात अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या देवदूतांना टीव्ही 9 मराठीचा सलाम, महाराष्ट्रवासियांकडून कौतुकाची थाप

महापुराच्या संकटातही काहीजण आपल्या जिवाची बाजी लावून दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. अशा या देवदूतांना टीव्ही 9 मराठी सलाम करतं. हजारो लोकांचे जीव वाचवणाऱ्या या देवदूतांचा विशेष सन्मान आज टीव्ही 9 मराठीकडून करण्यात आला. महापुराच्या संकटात सापडलेल्या कोल्हापुरातच हा सोहळा आयोजित करण्यात आला.

महापुराच्या संकटात अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या देवदूतांना टीव्ही 9 मराठीचा सलाम, महाराष्ट्रवासियांकडून कौतुकाची थाप
टीव्ही 9 मराठीकडून देवदूतांचा सन्मान
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 7:26 PM

मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि महापुरानं जुलैच्या अखेरिस थैमान घातलं होतं. या जलप्रलयात अनेकांचे घर-संसार उद्ध्वस्त झाले. शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले. अशा संकटातही काहीजण आपल्या जिवाची बाजी लावून दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. अशा या देवदूतांना टीव्ही 9 मराठी सलाम करतं. हजारो लोकांचे जीव वाचवणाऱ्या या देवदूतांचा विशेष सन्मान आज टीव्ही 9 मराठीकडून करण्यात आला. महापुराच्या संकटात सापडलेल्या कोल्हापुरातच हा सोहळा आयोजित करण्यात आला. (TV 9 Marathi pays Special honor to 11 people who saved hundreds of lives in the flood crisis)

देवदूतांचा सन्मान या विशेष सन्मान सोहळ्यात कोल्हापूर, चिपळूण, सांगली, महाडमधील देवदूतांचा समावेश आहे. जलप्रलयात हजारो नागरिकांचे जीव वाचवणाऱ्या 11 देवदुतांना पुरस्कार, ट्रॉफी, रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, शाळ, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि अभिनेक्षी दिपाली सय्यद यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.

11 देवदूतांचा सन्मान

1. सुनील कांबळे, कोल्हापूर 2. विश्वनाथ शिंदे, चिपळूण 3. सचिन लकेश्री, चिपळूण 4. महेश हिरेमठ, सांगली 5. रणजीतराजे शिर्के, चिपळूण 6. शुभांगी घराळे, कोल्हापूर 7. सुधीर भोसले, चिपळूण 8. साक्षी दाभेकर, महाड 9. पप्पू महाडिक, चिपळूण 10. महेश सानप, महाड 11. स्वप्निल पाटील, कोल्हापूर

देवदूतांनी दाखवलेलं शौर्य आणि त्यांच्या कामाची ओळख

पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ शिंदे

सदरक्षणाय खलनिग्रहणाय… महाराष्ट्र पोलिसांचे हे ब्रीद सार्थ करणारी ही कहाणी आहे चिपळूणमधील आहे. सगळं शहर संकटात सापडलेलं असताना काँन्स्टेबल विश्वनाथ शिंदे धीरोदात्तपणे मदतकार्यात लागलेले होते. महापुराच्या काळात काँन्स्टेबल विश्वनाथ शिंदे व त्यांचे दोन सहकारी लाइफ जॅकेट चढवून बोटीतून मोहिमेवर निघाले. चिंचनाका परिसरात हॉटेलच्या मजल्यावर तिघे अडकले होते. विश्वनाथ शिंदे पोहतच त्यांच्यापर्यंत पोचले होते. विश्वनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खर्डी, एसटी स्टँड परिसरातही अनेकांची अशीच सुटका केली.

सचिन लकेश्री

चिपळूणमध्ये आभाळ फाटलं होतं. घरांच्या छपरापर्यंत पाणी पोचलं होतं. मच्छी मार्केटमधल्या चौगुले कुटुंबातले सहा जण जीव मुठीत धरुन छतावर बसले होते. सचिन लकेश्री आणि त्यांच्या मित्रांनी सुटकेसाठी असं शीर तळहाती घेतलं होतं. 85 वर्षांचे चौगुले आजोबा अडखळले तेव्हा साऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पाण्याच्या प्रवाहाचा वेग तर थरकाप उडवणारा होता..तरीही साध्या शिडीच्या सहाय्यानं सहाही जणांची सुटका करण्यात आली. संकटात धावून येतो तोच खरा मित्र म्हणतात. सचिन आणि त्यांचे मित्र या वचनाला जागले.

आगारप्रमुख रणजीतराजे शिर्के

22 जुलैला चिपळूणमध्ये पाऊस जणू काळ बनून आला होता. पावसाचं पाणी प्रचंड वाढत होतं. ते किती वाढणार याची कुणालाच कल्पना करता येत नव्हती. रस्ते, दुकानं, घरं, बाजारपेठा सगळं पाण्याखाली जात होतं. चिपळूण आगारामध्येही वेगळं चित्र नव्हतं. बसेस जागच्या जागी थांबल्या होत्या. वाहतूक ठप्प झाली होती. अशा बिकट परिस्थितीतही आगारप्रमुख रणजीत राजे शिर्के पहाटे पावणे चार वाजता नोकरीवर रुजू झाले. महापुरामध्ये हाती असलेली एसटीची 9 लाखांची रोकड घेऊन शिर्के आणि त्यांच्या 7 सहकाऱ्यांनी एसटीचं छत गाठलं. रणजीत राजे शिर्के व त्यांचे सहकारी भर पावसात 9 तास बसच्या टपावर होते. शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. (TV 9 Marathi pays Special honor to 11 people who saved hundreds of lives in the flood crisis)

महेश सानप

महाडमध्ये गळापर्यंत आलेल्या पाण्यातून बाया, बापड्यांची सूटका करण्याचं काम महेश सानप आणि त्यांच्या मित्रांनी केलं. सावित्री नदीनं महाडला महापुरानं वेढल्यानंतर महाडवासिय संकटात सापडले होते. महेश सानप यांच्या टीमनं या संकटावरही मात करत 200 हून अधिक लोकांची सुटका केली. सुटका झालेले लोक 24 तासांपासून कुणी येईल का म्हणून वाट पाहात होते. सानप यांच्या टीमनं रात्रभर मदतीचं काम केलं. NDRF ची पोचण्यापूर्वीच महेश सानप महाडवासीयांसाठी देवदूत बनले होते.

महेश हिरेमठ

महेश हिरेमठ आणि त्यांची हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाऊंडेशन हे गेल्या 10 वर्षापासून सांगलीमध्ये लोकांना संकटातून बाहेर काढण्याचं काम करत आहेत. त्यांनी आणि त्यांच्या टीमने 32 हजाराहून अधिक लोकांना महापुराच्या संकटातून सोडवलं आहे. 2011 पासून ते पूर आणि संकटग्रस्तांना अशी मदत करत आलेयत. बेवारस मृतदेहांवर सन्मानानं अंत्यविधीचं कामंही त्यांची टीम करते. जुलै महिन्यात आलेल्या महापुरातही त्यांनी हजारो लोकांचे जीव वाचवण्याचं काम केलं आहे.

साक्षी दाभेकर

साक्षी दाभेकर या 14 वर्षीय मुलीचं शौर्य अन्य सगळ्या देवदुतांपेक्षा वेगळं आणि काळजाला हात घालणारं आहे. पोलादपूरच्या केवनाळे गावात जेव्हा एका घरावर दरड कोसळली तेव्हा साक्षी त्या घराच्या समोर होती. मातीच्या ढिगाऱ्याखालून साक्षीनं एका 1 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव वाचवला. मात्र, त्याचवेळी एक भिंत साक्षीच्या अंगावर कोसळली. यात तिला आपला डावा पाय कायमचा गमवावा लागला आहे. साक्षी ही तालुकास्तरावरील धावपटू आणि कबड्डीपटू होती. साक्षीला कृत्रिम पाय मिळवून देण्याची आणि तिच्या शिक्षणाची जबाबदारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. दरम्यान, धावपटू असलेल्या साक्षीसाठी एका बाळाचा जीव पणाला लागलेला असताना, त्या घरापर्यंत घेतलेली धाव, ही जगातली सर्वोत्तम धाव म्हणावी लागेल.

सुनील कांबळे

कोल्हापुरात महापूर असो की अपघात सुनील कांबळे यांचं नाव कोल्हापूरकरांच्या तोंडावर पहिल्यांदा येतं. आपत्ती व्यवस्थापन विभागातला हा अवलिया संकटाच्या काळात धावून जातो. 22 जुलैची रात्री कर्नाटकातल्या 35 प्रवाशांसाठी जणू काळरात्र ठरणार होती. कर्नाटक आगाराची बस रत्नागिरी रस्त्यावरुन मार्ग काढत केरलीपर्यंतच पोचली अन् तांत्रिक बिघाडानं जागेवरच थांबली. बसमधून खाली उतरणं जिकीरीचं होतं. तेव्हा सुनील कांबळे यांनी रात्री दोन वाजता 35 प्रवाशांची सुटका केली. महापुराच्या काळात आजारी रुग्ण, मृतदेह हलवण्याचं कामही सुनील कांबळे यांनी केलं. आठ दिवस अव्याहत हे मदतीचं काम सुरु होतं. (TV 9 Marathi pays Special honor to 11 people who saved hundreds of lives in the flood crisis)

एनडीआरएफ जवान स्वप्निल पाटील

आंबेवाडी आणि चिखली या कोल्हापुरातील ही दोन गावं पुरानं सर्वाधिक बाधित झाली होती. जवळपास ७० टक्के लोकांचं स्थलांतर करावं लागलं होतं. पण घरं आणि मुक्या जनवरांसाठी अनेकांनी घरं सोडली नाहीत. अखेर पूर ओसरला आणि त्यानंतर शेतात, पाण्यात आणि छतांवर अडकलेल्यांना लोकांसाठी एनडीआरएफ देवदूत बनून आलं. एनडीआरएफचे जवान स्वप्निल पाटील यांनी खांद्याचा आधार देऊन सीमा पाटील यांना खाली उतरवलं. सीमा पाटील यांना हृदयविकाराचा त्रास आहे. पुरानं त्या पुरत्या बिथरल्या होत्या, त्यामुळे त्यांना तातडीनं खाली उतरवून शांत करणं गरजेचं होतं. अश्यात सीडी शोधण्यात वेळ न दवडता स्वप्निल पाटील यांनी पुढाकार घेऊन त्यांना आधार देत खाली उतरवलं.

शुभांगी घराळे

कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या शुभांगी घराळे या रणरागिणीने कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरात अडकलेल्या अनेक माता, भगिनी, मुलं, वयोवृद्ध नागरिकांची सुटका केली. बोटीच्या माध्यमातून पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी शुभांगी आरोळी देत होती. तिने दिलेल्या आरोळीनं अनेकांच्या जिवात जीव येत होता. शुभांगीनं यंदाच्या महापुरात गरोदर महिला, दिव्यांग मुलांना आपल्या विशेष कौशल्यानं सुरक्षितस्थळी हलवलं. कुणाला आधी मदत पोहोचणं गरजेचं आहे, याचा प्राधान्यक्रमही ठरवला होता. कोणत्याही आपत्ती किंवा जोखमीवेळी पुरुषच धावतात, हा समज खोलवर रुजलेला समज शुभांगीनं अखेर आपल्या शौर्यानं दूर केला.

पप्पू महाडिक

चिपळूणमधल्या एका बिल्डिंगच्या व्यापारी गाळ्यात सकपाळ कुटुंबाचं दुकान होतं. जेव्हा सर्व लोक वरच्या मजल्यावर पोहोचले, तेव्हा पप्पू महाडिक आणि त्यांच्या साथीदारांना लक्षात आलं की, सकपाळ आणि त्यांची पत्नी दुकानातच अडकले आहेत. तेव्हा पप्पू महाडिक आणि त्यांचे साथीदार खाली उतरले. इमारतीच्या बाहेर 8 ते 9 तर दुकानात 6 फुटापर्यंत पाणी होतं. त्यात मुख्य दाराजवळ मगरी दबा धरुन बसल्या होत्या.समयसूचकता दाखवून हे चौघं जणं दुकानाच्या मागच्या बाजूला गेले. आधी तिथला एक्झॉस फॅन काढला आणि नंतर हतोडीनं सकपाळ कुटुंब बाहेर पडू शकेल एवढं छिद्र केलं आणि सपकाळ कुटुंबाला या संकटातून बाहेर काढलं.

सुधीर भोसले

महापुराच्या संकटाच्या काळात टीव्ही 9 मराठीवर तुम्ही एक व्हिडीओ अनेकदा पाहिला असेल. एक व्यक्ती दोरीच्या सहाय्यानं वरच्या मजल्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना तो अचानकपणे 30 फूट खाली पाण्यात कोसळतो. ती व्यक्ती म्हणजे सुधीर भोसले. दोरीच्या सहाय्यानं स्वत:चा जीव वाचवण्यापूर्वी त्यांनी आपली स्विटी नावाच्या कुत्रीचा जीव वाचवला. एका हातात कुत्री आणि दुसऱ्या हातानं दोरी पडलेल्या भोसले यांनी आधी कुत्रीला सुरक्षितपणे छतावर पोहोचवलं. मात्र, त्याचवेळी त्यांची दोरीवरील पकड सैल झाली. जेव्हा माणसावर बाका प्रसंग ओढवतो, तेव्हा रक्ताच्या नात्याचेही बंध तुटतात. पण, सुधीर भोसलेंनी आपल्याकडच्या मुक्या जनावराला अंतर दिलं नाही. म्हणूनचे ते देवदूत ठरतात.

इतर बातम्या :

UPSC Exam Calendar: यूपीएससीकडून 2022 च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, ‘इथे’ पाहा परीक्षांच्या तारखा

Video | बंदी असताना अहमदनगरात बैलगाडा शर्यतीचा थरार, कोरोना नियमांचे उल्लंघन

TV 9 Marathi pays Special honor to 11 people who saved hundreds of lives in the flood crisis

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.