Devendra Fadnavis : भोंगे वाजवल्याने राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्याने राग का येतो?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
भाजपकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भूमिकेला पाठिंबा मिळतोय. तर हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, म्हणत महाविकास आघाडी यावर सडकून टीका करत आहे. त्यामुळे सध्या हनुमान चालीसा आणि मशीदीवरील भोंगे या दोन्ही गोष्टींवरून राजकारण रंगताना पहायला मिळतंय.
कोल्हापूर : राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा मशीदीवरील भोंग्यांवरून (mosque loud speaker) आमनेसामने आले आहेत. भाजपकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भूमिकेला पाठिंबा मिळतोय. तर हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, म्हणत महाविकास आघाडी यावर सडकून टीका करत आहे. त्यामुळे सध्या हनुमान चालीसा आणि मशीदीवरील भोंगे या दोन्ही गोष्टींवरून राजकारण रंगताना पहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यावरून आता काही खोचक सवाल विचारले आहेत. भोंगे वाजवल्याने राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्याने राग का येतो? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना विचारला आहे. त्यामुळे सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्येही जोरदार खडाजंगी सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांनी हिंदुत्वावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेच शिवसेना स्टाईलने फडणवीसांचा समाचार घेतला आहे.
फडणवीस काय म्हणाले?
आज राम नवमी आहे. त्यानिमीत्ताने मनसेने शिवसेना भवनसमोरील रस्त्यावरच हनुमान चालीसा सुरू केली. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले हनुमान चालिसा ही आपली परंपरा आहे. काही लोकांना हनुमान चालिसाचा का राग येतो? भोंगे वाजल्याने राग येत नसेल तर हनुमान चालिसाने राग का येतो? असे म्हणत त्यांनी तिखट सवाल केले आहेत. एवढंच नाही तर भगव्या झेंड्यावरून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे. नाना पटोलेंना भगव्याची चीड का आहे. भगव्या झेंड्याचं नाव घेतल्यावर नाना पटोलेंना राग का येतो, असा सवालही फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे सध्या जोरदार वातावरण तापलं आहे.
मनसेचीही सेनेवर जोरदार टीका
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही हिंदुत्वावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी संपलेल्या पक्षावर मी प्रतिक्रिया देत नाही, असे खोचक उत्तर दिले होते, त्यावर बोलताना मनसे पक्ष संपला कि नाही जनता ठरवेल पण सेनेचे हिंदुत्व संपलं आहे, असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे. आम्ही सेना भवनसमोर हनुमान चालीसा वाचली म्हणून यांना राग का येतो? आदित्य ठाकरेंनी आमच्या पक्षाबाबत बोलू नये. आधी शिवसेना ही मुस्लिम लीग सेना झाली का? हे पाहवं. असा टोला त्यांनी लगावला आहे. राज ठाकरेंची गुढी पाडव्याची सभा झाल्यापासून हा मशीदीवरील भोंग्यांचा आणि हनुमान चालीसा यांचा वाद पेटला आहे.
Arvind Sawant : मुंबई केंद्रशासित करण्याची हिंमत करून दाखवा, मग बघाच, अरविंद सावंत यांचा इशारा
जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी – उद्धव ठाकरे