शिंदे सरकारमधील या बड्या मंत्र्यांची फडणवीस सरकारमध्ये गच्छंती? नवीन चेहऱ्यांसाठी जुन्यांना बसवले घरी

Devendra Fadnavis Cabinet Expansion: बड्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना फोन आलेले नाही. भाजपकडून सुधीर मुनंगटीवार, रवींद्र चव्हाण यांना अजूनही फोन आलेला नाही. तसेच शिंदे सेनेचे दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांनीही फोन आलेले नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

शिंदे सरकारमधील या बड्या मंत्र्यांची फडणवीस सरकारमध्ये गच्छंती? नवीन चेहऱ्यांसाठी जुन्यांना बसवले घरी
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 12:56 PM

Devendra Fadnavis Cabinet Expansion: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला विस्तार रविवारी होत आहे. या सरकारमध्ये भाजपचे २० शिवसेनेचे १० तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री शपथ घेणार आहेत. या शपथविधी समारंभासाठी अनेक आमदारांना फोनही गेले आहे. ज्यांना फोन गेले आहेत, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित समजला जात आहे. परंतु मागील शिंदे सरकारमध्ये असलेल्या अनेक ज्येष्ठांना अजूनही फोन गेले नाही. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी जुन्या नेत्यांना घरी बसवण्यात आल्याची शक्यता आहे. बड्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना फोन आलेले नाही. भाजपकडून सुधीर मुनंगटीवार, रवींद्र चव्हाण यांना अजूनही फोन आलेला नाही. तसेच शिंदे सेनेचे दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांनीही फोन आलेले नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

नाशिकमध्ये फक्त झिरवाळ यांना फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिले जाणार नसल्याचे संकेत आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याची चर्चा आहे. 2014 ते 2019 हा काळ वगळला तर छगन भुजबळ अनेक वर्षे मंत्री राहिले आहेत. उपमुख्यमंत्रीसह गृहमंत्री म्हणून देखील भुजबळांनी काम पाहिले आहे. नाशिक जिल्ह्यात 7 राष्ट्रवादी आमदारांपैकी फक्त नरहरी झिरवाळ यांना आला आहे.

मंत्रिमंडळात या नावांची शक्यता

भाजप – देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फंडकर, अशोक उईके जयकुमार गोरे

हे सुद्धा वाचा

शिवसेना – एकनाथ शिंदे, संजय शिरसाठ, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जैस्वाल

राष्ट्रवादी – अजित पवार, नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, सना मलिक – राज्य, इंद्रनील नाईक – राज्य

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.