मुंब्र्याला शिवरायाचं मंदिर उभारु चला, फडणवीस यांचं उद्धव ठाकरे यांना आव्हान

महायुतीने आज कोल्हापुरातून प्रचाराचा शुभारंभ केला. आपल्या पहिल्याच सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकासआघडीचे नेते हे महाराष्ट्रा विषयी खोटं बोलतात. अशी टीका त्यांनी यावेळी केली.

मुंब्र्याला शिवरायाचं मंदिर उभारु चला, फडणवीस यांचं उद्धव ठाकरे यांना आव्हान
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 10:50 PM

महायुतीने आज कोल्हापुरातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. आज कोल्हापुरात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. महाविकासआघाडीचे नेते खोटे बोलतात. हे ज्या घोषणा करतात ते कधीच करत नाही. असं ही फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केली की ते संपूर्ण जिल्ह्यात शिवरायांचा पुतळा उभारणार आहेत. मी त्यांना सांगतो चला मग मुंब्र्यात आपण शिवरायांचा पुतळा उभारुयात आणि छत्रपतींना मानवंदना देऊयात.’

फडणवीस म्हणाले की, ‘उत्तरेतून पंजा गायब आणि पश्चिमेतून देखील करायचा आहे. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी पुन्हा आशीर्वाद मिळू दे. कोल्हापुरातून सुरुवात केली की विजय मिळतोच मिळतो. उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते. ते म्हणाले की महाराजांचा इंग्रजांवर राग होता म्हणून सुरत लुटली. तुम्हाला आता औरंगजेबाचं नाव घ्यायला लाज वाटू लागली. हिंदुहृदयसम्राट नाव बाळासाहेबांच्या नावापुढचं काढून टाकलं. सुरतेला जाऊन महाराजांचं मंदिर बांधणार म्हणाले. २२ वर्षापूर्वीच सुरतमध्ये मोदींजींनी पुतळा उभारला आहे.

‘मुंब्र्याला शिवरायाचं मंदिर उभारु चला मग उद्धव ठाकरे. ज्यांच्याकडे बोलायला काही नाही. विकासाशी संबंध नाही. अडीच वर्षात जे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात करुन दाखवलं त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही. महाविकासआघाडीचे सरकार आले तेव्हा कर्नाटक पहिल्या स्थानावर गेलं. आमच्या वेळी महाराष्ट्र पहिल्या स्थानावर होतं. त्यांच्याच राज्यात गुजरात पहिल्या स्थानावर गेलं. पण नंतर जेव्हा पुन्हा आमचं राज्य आले तेव्हा पुन्हा एकदा महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रामध्ये आता एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक आणली आहे. महाविकासआघाडी रोज खोटे बोलतात. गुजरातचं प्रमोशन तुम्ही करताय. तुमचा मराठी बाणा कुठे गेला.’ असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केलाय.

‘मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना आम्ही आणली. यांचा एक उमेदवार म्हणतो आमच्याकडे माल आला आहे. एक जण म्हणतो बकरी आलीये. कुठे गेले तुमचे संस्कार. आधी तुमचं घर सुधरवा. महिलांना पुढे आणण्याचं काम आपलं सरकार करत आहे. महिलांच्या विरोधात गुन्हा घडला तेव्हा त्याच्याविरोधात कठोर शिक्षा देण्याचं काम हेच सरकार करत आहे.’

‘शेतकऱ्यांना मोफत वीज दिली. पुढील काही काळात २४ तास वीज मोफत दिली जाईल असं काम सरकार करत आहे. ज्यांना बजेट सुद्धा कळत नाही. त्यांना सांगतो आमची एकही योजना बंद होणार नाही. महाविकासआघाडी तर ते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात गेले आहेत. त्यांनी जी घोषणा केली एकही पूर्ण केली आहे. भाजपच्या राज्यातील घोषणा बघा सगळ्या घोषणा आम्ही पूर्ण केल्या आहेत. तुम्ही आशीर्वाद द्या तुमच्या मनातील महाराष्ट्र आम्ही घडवून दाखवू.’ असं ही फडणवीस शेवटी म्हणाले.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....