फडणवीस ‘क्लीन मास्टर’, भुजबळांची सडकून टीका; ठाकरे-पवारांसारखेच मुख्यमंत्री लक्षात राहतात…!
कित्येक मुख्यमंत्री येतात आणि जातात. त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसारखे काहीच जण लक्षात राहतात. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस तर क्लीन चीट देऊन टाकायचे. त्यांना तेव्हा 'क्लीन मास्टर' म्हटले जायचे, असा घणाघात शनिवारी मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
नाशिकः कित्येक मुख्यमंत्री येतात आणि जातात. त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसारखे काहीच जण लक्षात राहतात. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस तर क्लीन चीट देऊन टाकायचे. त्यांना तेव्हा ‘क्लीन मास्टर’ म्हटले जायचे, असा घणाघात शनिवारी मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
छगन भुजबळांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत चौफेर फटकेबाजी केली. विशेषतः देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी सडकून टीका केली. मंत्री भुजबळ म्हणाले, देवेंद्र फडणीस यांना पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर देणं आवश्यकच होतं. कारण देवेंद्र फडणीस हे स्वतः मुख्यमंत्री असताना क्लीन चीट देऊन टाकायचे. उद्धव ठाकरे यांच्याकडे हा गुण नाही. अहो इतकेच काय, फडणवीसांना शेवटी-शेवटी तरी चक्क ‘क्लीन मास्टर’ म्हंटलं जायचं, असं म्हणत त्यांनी देवेंद्र यांना लक्ष केलं. दुसरीकडे ठाकरे पवारांवर स्तुती सुमने उधळताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना बाळकडू मिळालेलं आहे. दसऱ्याला त्यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यातलं तथ्य लोकांना आवडत आहे. मुख्यमंत्री किती येतात आणि जातात. मात्र, उद्धव ठाकरे , शरद पवार असे काही जण लक्षात राहतात. मला मात्र मुख्यमंत्री बनण्याची आज इच्छा नाही. कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन माणसं भेटत नाहीत. आज मला जनतेकडून प्रेम मिळत आहे. ओबीसीच्या माध्यमातून हे प्रेम मिळत आहे. ते भरपूर असल्याचंही ते म्हणाले. मुंडे बहीण-भावांचा कलगीतुरा कधीतरी थांबेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
मला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं असतं, पण…
भुजबळ म्हणाले, बाळासाहेबांनी आपल्याला मुख्यमंत्री जाहीर करतो असं सांगितलं होतं. मी मुख्यमंत्री झालो असतो, पण ओबीसी राजकरणामुळं मी शिवसेना सोडली. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मी सरकारवर हल्ले करायचो आणि माझ्यावर सरकार करायचं. आमच्या पक्षाची यंत्रणा नव्हती. पवार साहेब, मी लढलो होतो. काँग्रेस पेक्षा कमी जागा मिळाल्या. दोघांची बेरीज शिवसेनेपेक्षा जास्त होती. मनोहर जोशी पडले होते. खरे तर मी शिवसेनेत असताना महापौरांची गाडी घेवून फिरत होतो. शिवसेनेच्या बाजूने लोकसंग्रह केला. हा सगळा इतिहास झाला. बाळासाहेबांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. नगरसेवक म्हणून निवडून दिलं. महापौर पद सुद्धा मला मिळालं. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, भुजबळ गेले नसते, तर शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते. ते अनेकांना असं म्हणाले होते. त्यावेळी मी निधड्या छातीनं लढत होतो, असं म्हणत भुजबळ जुन्या आठवणीत रमले.
देवेंद्र फडणीस यांना पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर देणं आवश्यकच होतं. कारण देवेंद्र फडणीस हे स्वतः मुख्यमंत्री असताना क्लीन चीट देऊन टाकायचे. उद्धव ठाकरे यांच्याकडे हा गुण नाही. अहो इतकेच काय, फडणवीसांना शेवटी-शेवटी तरी चक्क ‘क्लीन मास्टर’ म्हंटलं जायचं. – छगन भुजबळ, मंत्री
इतर बातम्याः
लाल कांदा तळपलाः नाशिकमध्ये क्विंटलमागे 5151 रुपयांचा भाव; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक!
डेंग्यू, चिकुन गुन्याचे नाशिकमध्ये थैमान; रुग्णांनी गाठला पाच वर्षांतील उच्चांक
डेंग्यू, चिकुन गुन्याचे नाशिकमध्ये थैमान; रुग्णांनी गाठला पाच वर्षांतील उच्चांकhttps://t.co/B4rDlKToaa#Nashik|#ChikunGunya|#Dengue|#NashikMunicipalCorporation|#NashikHealthDepartment|#Patientsreachedafiveyearhigh
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021