Devendra Fadnavis on Satish Uke arrest: कायद्याने जे व्हायचं तेच होईल, उके यांच्या अटकेनंतर फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांचे वकील सतिश उके (satish uke) यांना काल ईडीने अटक केली आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणी उके यांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis on Satish Uke arrest: कायद्याने जे व्हायचं तेच होईल, उके यांच्या अटकेनंतर फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया
कायद्याने जे व्हायचं तेच होईल, उके यांच्या अटकेनंतर फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रियाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 2:15 PM

नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांचे वकील सतिश उके (satish uke) यांना काल ईडीने अटक केली आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणी उके यांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला या कारवाईची कल्पना नाही. मी माध्यमात बघितलं. एका जमिनीच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. ईडीला तक्रार झाली होती. त्यानंतर ईडीने कारवाई केली. मूळ तक्रार नागपूर पोलिसांची आहे. त्यावर आधारीत कारवाई झाली आहे. 2005 पासून त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात एफआयआर आहेत. वेगवेगळ्या न्यायाधीशांची खोटी तक्रार केल्याने त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उके यांची शिक्षा का वाढवू नये असं म्हटलं आहे. सध्या हा विषय कोर्टात प्रलंबित आहे, असं सांगतानाच या प्रकरणात कायद्याने जे व्हायचं तेच होईल, अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मुंबईतील मेट्रोच्या श्रेयवादावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. यात श्रेयवादाची कुठली लढाई नाहीये. दोन मेट्रोलाईनचं काम आम्ही सुरू केलं होतं याचा आम्हाला आनंद आहे. ते आता पूर्ण होत आहे. मुंबईकरांना माहीत आहे आम्ही दोन वर्ष किती वेगाने काम केलं. आता ते काम पूर्ण होत आहे. लोकांच्या सेवेत येत आहे. सर्वात महत्त्वाची मेट्रो लाईन थ्री आहे. कुलाब्यापासून सीप्झपर्यंत एक मेन फिडर 40 किलोमीटरची लाईन आहे, त्याचं 80 टक्के काम पूर्ण झालं. त्याला कारशेड न मिळाल्याने पुढील चार वर्ष ती लाईन सुरू होऊ शकत नाही. आरेचं कारशेड केलं तर नऊ महिन्यात ती लाईन सुरू होऊ शकते. ती लाईन तात्काळ सुरू करावी. नाही तर श्रेय घेता घेता हे अपश्रेय देखील त्यांना घ्यावं लागेल, असा टोला फडणवीसांनी लगावला.

अल्पसंख्याकांच्या मतांसाठी भीतीचं वातावरण

अभ्यासक्रमातील बदलांबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा अभ्यासक्रम पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. त्यात वेळोवेळी तज्ज्ञांनी बदल केला आहे. केवळ अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून भीतीचं वातावरण केलं जात आहे. अलिकडच्या काळात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत अल्पसंख्याक मतं मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे, अशी टीका त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

Shivsena NCP: शिवसेनाला गृहखातं हवंय?, भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याने सेना-राष्ट्रवादीत धूसफूस; गृहमंत्री घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Shivsena NCP: आस्ते कदम भूमिका घ्याल तर स्वत:साठी फाशीचा दोर वळलाच म्हणून समजा; राऊतांच्या गृहखात्याला कानपिचक्या

Maharashtra News Live Update : 6 एप्रिलला धोपेश्वर येथे ग्रामसभेचं आयोजन; रिफायनरीबाबत होणार ठराव

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.