अजित पवारांना शरद पवार ‘व्हिलन’ बनवत होते, कारण… देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

2009 ते 2012 पर्यंत मी अजित पवार यांच्यावर आरोप करत आलो. त्यावेळी ते मंत्री होते. मी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात आली. तपासात मी केलेले आरोप खरे असल्याचे समोर आले. त्यानंतर भ्रष्टाचार करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

अजित पवारांना शरद पवार 'व्हिलन' बनवत होते, कारण... देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट
अजित पवार शरद पवार देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 11:11 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत महायुतीची संगत घेतली. अजित पवार यांनी महायुतीसोबत येण्याचा प्रयत्न यापूर्वी केला. परंतु तो यशस्वी झाला नव्हता. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची चर्चा आणि अजित पवार यांच्यासंदर्भात गौप्यस्फोट केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर सनसनाटी निर्माण करणारा आरोप केला आहे. शरद पवार अजित पवार यांना व्हिलन बनवत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

काय म्हटले देवेंद्र फडणवीस यांनी

मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांना भाजपसोबत युती हवी होती. तीन वेळा त्यांनी यासंदर्भात निर्णय घेतला. परंतु तो फिरवला. आता त्याचे विश्लेषण करताना मला वाटते की, शरद पवार नेहमी अजित पवार यांना पुढे करुन व्हिलन बनवत होते. कारण राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्यासोबत होता. अजित पवार यांचे पक्षातील वजन कमी करता येत नव्हते. परंतु त्यांना व्हिलन तर बनवता येईल, हाच त्यांचा विचार होता. अजित पवार यांना व्हिलन बनवून घरात कोणाला तरी हिरो बनवण्याचे काम शरद पवार यांनी केले. कारण पक्षावर त्यांना त्यांचीच सत्ता हवी होती.

अजित पवार यांच्यावर फडणवीस यांनी केले होते आरोप

अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2009 ते 2012 पर्यंत मी अजित पवार यांच्यावर आरोप करत आलो. त्यावेळी ते मंत्री होते. मी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात आली. तपासात मी केलेले आरोप खरे असल्याचे समोर आले. त्यानंतर भ्रष्टाचार करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. अनेकांना बडतर्फ करण्यात आले, अनेकांना शिक्षा झाली. अजित पवार हे त्या विभागाचे प्रमुख होते. परंतु या संपूर्ण तपासात त्याचा थेट संबंध आढळून आला नाही. त्यामुळे त्याचे नाव आरोपपत्रात आले नाही. अजित पवार आता आमच्यासोबत आले आहेत, परंतु या प्रकरणाचा तपास 2012 मध्ये झाला होता.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मागील दोन निवडणुकींपेक्षा जास्त प्रचारसभा घेत आहेत. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता प्रचाराला वेळ चांगला मिळला आहे. यामुळे सभाची संख्या वाढली आहे. तसेच मागील वर्षी शिवसेना एक होती. आता शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि उद्धव ठाकरे यांची झाली आहे. यामुळे मते विभागली जाणार आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.