मुख्यमंत्रीपदासाठी 2-1-2 चा फॉर्म्युला? कोण किती वर्षे मुख्यमंत्री राहणार?

मुख्यमंत्रिपदावरुन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे भाजपचे नेते उघडपणे ऑन कॅमेरा सांगत आहेत. तर शिंदेंना पुन्हा संधी द्या म्हणत शिंदेंच्या नेत्यांनीही मुख्यमंत्रिपदावरुन दावा सोडलेला नाही.

मुख्यमंत्रीपदासाठी 2-1-2 चा फॉर्म्युला? कोण किती वर्षे मुख्यमंत्री राहणार?
ajitdada, devendra fadnavis and eknath shinde
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 10:27 PM

TV9ला खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीसांचं नाव दिल्लीच्या हायकमांडकडून निश्चित झालंय आणि अधिकृत घोषणा भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नेता निवडून होईल. पण असं असलं तरी, शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंचं नावही वारंवार पुढं आणलं जातंय. त्यातच अजित पवारांचीही एंट्री झालीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी 2-1-2 असा फॉर्म्युला पुढं आणला गेल्याची माहिती आहे. 2-1-2 म्हणजे काय, तर सुरुवातीचे 2 वर्षे भाजप अर्थात फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. नंतर एक वर्षासाठी मुख्यमंत्रीपद अजित पवारांनी मागितल्याचं कळतंय. कारण आपल्याला संधी कधी मिळेल असं अजित पवारांचं म्हणणं असल्याचं समजतंय आणि 3 वर्षे संपल्यानंतर शेवटचे 2 वर्षे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद द्यावं, असा फॉर्म्युला चर्चेला आहे. पण 132 आमदारांचं तगडं संख्याबळ भाजपकडे असताना हायकमांड पुन्हा मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांना देणार का? हाही प्रश्न आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं ऐतिहासिक कामगिरी करत 132 आमदार जिंकून आणले. त्यातच आता रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा आणि शिवाजी पाटील या 5 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठींबा दिला. त्यामुळं भाजपचं अपक्षांसह संख्याबळ 137 वर आलंय. तर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी बिहार पॅटर्नची भाजपला आठवण करुन दिली. कमी संख्याबळ असतानाही बिहारमध्ये भाजपनं नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं, त्यामुळं बिहार पॅटर्ननुसार शिंदेंनाच मुख्यमंत्रिपद द्या असा सायकॉलॉजिकल दबाव शिंदेंच्या शिवसेनेकडून टाकण्यात आला. मात्र बिहार पॅटर्न एकदाच होतो म्हणत भाजपकडूनही तात्काळ राम शिंदेंनीही उत्तर दिलं.

भाजप आणि शिवसेना दोघांचा मुख्यमंत्रीपदावर दावा

मुख्यमंत्रीपदासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार दावे-प्रतिदावे सुरु आहेत. सागर बंगल्यावर भाजपचे नेते आणि आमदारांकडून फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी सुरु आहे. भेटून आल्यावर फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार आणि नेते देत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दादा भूसे, शंभूराज देसाई, उदय सामंत, नीलम गोऱ्हेंनीही सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली. खरं तर प्रचाराच्या पहिल्याच दिवशी, शिराळातून अमित शाहांनी देवेंद्र भाई को विजयी बनाना है, म्हणत फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत दिले होते.

हे सुद्धा वाचा

भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच आहेत. महाराष्ट्रात तब्बल 132 आमदारांपर्यंतच फडणवीसांनी भाजपला आणलं. 2019मध्ये युतीला बहुमत मिळालं असतानाही 105 आमदार येवूनही उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले आणि फडणवीसांचं मुख्यमंत्रिपद हुकलं. अडीच वर्षांआधीही शिंदेंच्या बंडांनंतर भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदाचा आदेश दिला. हायकमांडचा आदेश मानत फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आता परिस्थिती पूर्ण भाजपच्या बाजूनं आहे. 132 आमदार भाजपचे आहेत. त्यामुळं फडणवीसच पुन्हा येणार हे, जवळपास निश्चित आहे.

'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.