VIDEO: देवेंद्र फडणवीस मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना भेटले; जळगाव भाजपमधील पडझड थांबणार?

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुक्ताईनगरमध्ये जाऊन भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. (Devendra Fadnavis met Raksha Khadse daughter-in-law of Eknath Khadse in Jalgaon)

VIDEO: देवेंद्र फडणवीस मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना भेटले; जळगाव भाजपमधील पडझड थांबणार?
raksha khadse
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 12:57 PM

जळगाव: भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुक्ताईनगरमध्ये जाऊन भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पक्ष बांधणीवर चर्चा केली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव भाजपला गळती लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे जळगाव भाजपमधील पडझड थांबणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Devendra Fadnavis met Raksha Khadse daughter-in-law of Eknath Khadse in Jalgaon)

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच जळगावमध्ये आले होते. त्यांनी मुक्ताईनगरमध्ये थेट एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते गिरीश महाजनही उपस्थित होते. फडणवीस येणार म्हणून खडसे यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी फडणवीस यांनी खडसेंच्या घरात बसून जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या बांधणीवर रक्षा खडसे यांच्याशी चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच जळगावमध्ये खासकरून रावेर मतदारसंघात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीवरही त्यांनी चर्चा केली.

पडझड थांबणार?

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आल्यापासून जळगाव भाजपमध्ये मोठी पडझड सुरू झाली आहे. अनेक नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. ग्रामपंचायतीचा निकालही भाजपच्या विरोधी गेला आहे. खडसे गेल्यानंतर पक्षाची होणारी पडझड थांबवण्यासाठी गिरीश महाजन यांचे प्रयत्नही अपुरे पडताना दिसत आहे. त्यामुळे जळगाव भाजपमधील पडझड रोखण्यासाठी फडणवीस यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. फडणवीस यांनी या भेटीत पक्षाच्या बांधणीवरच रक्षा खडसे आणि महाजन यांच्याशी चर्चा केल्याने फडणवीसांनी जळगाव जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं बोललं जात आहे.

रुग्णालयाची पाहणी

फडणवीस जवळपास अर्धा तास खडसे यांच्या निवासस्थानी होते. त्यानंतर ते ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना झाला. या ठिकाणी त्यांनी आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. नंतर त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन केळी पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधला

ताफा अडवला

खडसे यांच्या घरातून निघून नुकसानीची पाहणी करत असताना काही शेतकऱ्यांनी फडणवीसांचा ताफा अडवला. यावेळी त्यांनी सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नसून आम्हाला मदत करावी, असं आवाहन फडणवीसांना केलं. (Devendra Fadnavis met Raksha Khadse daughter-in-law of Eknath Khadse in Jalgaon)

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस काल शरद पवारांच्या निवासस्थानी, आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी!

देवेंद्र फडणवीस भेटीसाठी शरद पवारांच्या घरी, सिल्व्हर ओकवर भेट

संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दूर केला, गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

(Devendra Fadnavis met Raksha Khadse daughter-in-law of Eknath Khadse in Jalgaon)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.