मुंबईकरांनी खूप भोगलंय; हात जोडून विनंती करतो, मेट्रोचा विषय वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका: देवेंद्र फडणवीस

हवं तर कांजूरमार्ग मेट्रोचं श्रेय तुम्हाला देतो, पण कद्रूपणा सोडा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर पटलवार केला आहे. (devendra fadnavis slams CM Uddhav Thackeray over kanjurmarg carshed issue)

मुंबईकरांनी खूप भोगलंय; हात जोडून विनंती करतो, मेट्रोचा विषय वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका: देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 3:37 PM

मुंबई: हवं तर कांजूरमार्ग मेट्रोचं श्रेय तुम्हाला देतो, पण कद्रूपणा सोडा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर पटलवार केला आहे. हा श्रेयाचा प्रश्नच नाही. मुंबईकरांनी आधीच खूप भोगलंय. त्यांना आणखी त्रास देऊ नका. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अशी कळकळीची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (devendra fadnavis slams CM Uddhav Thackeray over kanjurmarg carshed issue)

देवेंद्र फडणवीस यांनी कांजूरमार्ग मेट्रोच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही कळकळीची विनंती केली आहे. प्रश्न श्रेयाचा नाहीच. तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधांचा आहे. श्रेयासाठी काम करणं हा भाजपचा स्वभाव नाही. त्यामुळे हा प्रश्न अपश्रेयाचा करू नये आणि हे अपश्रेय तुमच्या वाटेला येऊ नये हीच सदिच्छा, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. यावेळी कारशेडसाठी भविष्यात अतिरिक्त जागा लागणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा मुद्दाही फडणवीस यांनी खोडून काढला. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नाही. मग ही दिशाभूल कशासाठी? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

उच्चाधिकार समितीचा अहवाल जाहीर कराच

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी 30 मिनिटे संवाद साधला, पण त्यांनी अजूनही महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीने कांजूर मार्ग कारशेडसाठी दिलेला अहवाल वाचलेला नाही, हे प्रकर्षाने जाणवलं, असा चिमटा काढतानाच मुख्यमंत्र्यांनी एकदा हा अहवाल सार्वजनिक करावाच. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका आणि वास्तव महाराष्ट्रातील जनतेसमोर आणाच, असं आव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. कांजूरमार्गमध्ये कारशेड नेल्याने राज्याचं मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचं या समितीने स्पष्ट केलं असून चार वर्षाचा विलंबही होणार असल्याचं म्हटलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. (devendra fadnavis slams CM Uddhav Thackeray over kanjurmarg carshed issue)

आरेत बांधकाम करावेच लागेल

कांजूरमध्ये कारशेड करायचे ठरले तरी आरेत बांधकाम करावेच लागणार आहे. हे मुख्यमंत्री का लपवून ठेवत आहेत? असा सवाल करतानाच आरेची जागा डोळ्यासमोर ठेवूनच बोगदे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जवळपास 80 टक्के हे काम पूर्ण झाले आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाणार आहे. मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे. त्यांना आणखी त्रास देऊ नका. हा प्रश्न वैयक्तिक करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. (devendra fadnavis slams CM Uddhav Thackeray over kanjurmarg carshed issue)

संबंधित बातम्या:

हवं तर कांजूर कारशेडचं श्रेय तुम्हाला देतो, पण कद्रूपणा सोडा; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन

सरकार पडलं नाही, पण राजकीय हल्ले परतवत आघाडीने एक वर्षे पूर्ण केलं; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

होय, मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे

(devendra fadnavis slams CM Uddhav Thackeray over kanjurmarg carshed issue)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.