VIDEO: मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला सर्वात कमी निधी, राष्ट्रवादी सर्वाधिक मालामाल, फडणवीसांकडून आकडेवारीच सादर
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे आहे. म्हणजे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुखच राज्याचे मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला अर्थसंकल्पातून सर्वाधिक कमी निधी मिळाल्याचं उघड झालं आहे.
मुंबई: राज्यात महाविकास आघाडीची (mahavikas aghadi) सत्ता आहे. या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे आहे. म्हणजे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुखच राज्याचे मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला अर्थसंकल्पातून सर्वाधिक कमी निधी मिळाल्याचं उघड झालं आहे. अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राष्ट्रवादीला सर्वाधिक, त्यानंतर काँग्रेसला आणि सर्वात कमी निधी शिवसेनेला (shivsena) कसा मिळाला हे स्पष्ट केलं. हे सांगताना फडणवीसांनी सभागृहात आकडेवारीच सादर केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचाही प्रयत्न केला. अजितदादांना मानलंच पाहिजे. ते डंके की चोटपर काम करतात. मागच्यावेळीही त्यांनी हेच केलं होतं. असं ठाम काम पाहिजे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला खिजवण्याचा प्रयत्न केला.
अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाचं आकारमान 5 लाख 48 हजार 747 कोटी इतकं आहे. त्यापैकी राष्ट्रवादीच्या खात्यांना 3 लाख 14 हजार 820 म्हणजे 57 टक्के निधी देण्यात आला. काँग्रेसच्या खात्यांना 1 लाख 44 हजार 193 कोटी देण्यात आले. म्हणजे 26 टक्के निधी दिला गेला. शिवसेनेला 90 हजार 181 कोटी म्हणजे 16 टक्के निधी दिला गेला. विशेष म्हणजे जिथे पगार द्यावा लागतो अशी खाती राष्ट्रवादीकडे नाहीये. ती खाती काँग्रेसकडे आहेत. शिक्षण विभाग काँग्रेसकडे आहे. तर उच्च शिक्षण विभाग शिवसेनेकडे आहे. तरीही शिवसेनेला त्याची काळजीच नाही. ज्यांना काळजी आहे त्यांच्यासाठी सांगतो. अजितदादांना मानलंच पाहिजे. डंके की चोटपर त्यांनी काम केलं. मागच्यावेळी हेच केलं. यावेळीही हेच. असं पाहिजे काम. एकदम ठाम. सर्व पैसा राष्ट्रवादीकडे. म्हणजे 57 टक्के निधी राष्ट्रवादीकडे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले.
सामाजिक योजनांवरून हल्लाबोल
सामाजिक योजनांच्या अंमलबजावणीवरूनही त्यांनी आघाडी सरकारला धारेवर धरलं. राज्यात सामाजिक योजनांची अतिशय दयनीय अंमलबजावणी होत आहे. कोविड 19चं वर्ष हे सामाजिक योजनांच्या अंमलबजावणीचं असायला हवं होतं. काय अवस्था आहे बघा. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान आणि प्रधानमंत्री मातृत्व योजनांचा अभ्यास केला तर 2019-20मध्ये प्रसूती पूर्व सेवा मिळविलेल्या महिलांची संख्या होती 3 लाख. 2021मध्ये ती 72 हजार झाली. ज्या काळात खरी गरज होती ती मिळाली नाही. खर्चही निम्मा झाला, असं त्यांनी सांगितलं.
कसली पंचसूत्री?
अजितदादा, पैसा देताना राष्ट्रवादीसाठी कसा जोरात राखून ठेवता. तुम्ही दोनदा घोषणा केली. 500 ते 700 रुपये भरले तरी मे पर्यंत शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापणार नाही, असं तुम्ही म्हटलं होतं. कुठे गेली तुमची घोषणा? तुमच्या पंचसूत्रीत पाणी दिसतंय, पीक दिसतंय आणि वीज नाहीये. कसली पंचसूत्री? शेतकरी पंचतत्त्वात विलीन होतोय आणि कसली पंचसूत्री. गावोगावी हा आक्रोश वाढतोय, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
राजकीय आंदोलनातील केसेस मागे घेणार; दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा
Police Recruitment : राज्यात 7231 पदांची भरती लवकरच, नंतर आणखी पदे भरणार: दिलीप वळसे पाटील